(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अश्नीर ग्रोव्हर यांचा रिअॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ सध्या जोरदार चर्चेत आहे. धनश्री वर्मा आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग यांची ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधील मैत्री प्रेक्षकांना फारच भावली होती. त्यांच्या केमिस्ट्रीची आणि मजेदार ट्यूनिंगची सोशल मीडियावरही खूप चर्चा होती.मात्र, शोच्या प्रवासात एक वळण असं आलं की पवन सिंगने मध्यभागीच शो सोडण्याचा निर्णय घेतला.
‘राइज अँड फॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेली जोडी म्हणजे धनश्री वर्मा आणि भोजपुरी पावर स्टार पवन सिंग. दोघांमधील मैत्री, हलकंफुलकं फ्लर्टिंग आणि एकमेकांवरील आदर, हे सर्व त्यांच्या नात्याचं खास वैशिष्ट्य ठरलं.शोमध्ये असताना पवन सिंग धनश्रीला नेहमी म्हणायचा, “तू टिकली लाव,
टिकली लावल्यावर तू फार छान दिसशील!”पण धनश्री त्याला हसत उत्तर द्यायची, “जेव्हा मी इंडियन कपडे घालेन, तेव्हाच टिकली लावेन!”
“राईज अँड फॉल” या शोच्या नवीन भागात धनश्री लाल साडीत नाही तर पारंपारिक भारतीय लूकमध्ये दिसली. ती लाल सूटमध्ये दिसली आणि तिने लाल टिकली ही लावली होती. तिचा लूक पाहण्यासारखा होता आणि चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही आला, ज्यामध्ये ती या लूकमध्ये दिसत आहे. जेव्हा पवन सिंग शोमध्ये असायचा तेव्हा तो अभिनेत्रीला टिकली लावायला सांगायचा. धनश्री म्हणायची की ती ज्या दिवशी भारतीय कपडे घालेल त्या दिवशी ती टिकली लावेल. आता पवन सिंग शो सोडल्यानंतरही, अभिनेत्री तिचे वचन विसरलेली नाही.
धनश्री वर्मा लाल सूट आणि टिकलीमध्ये पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.चाहत्यांचं म्हणणं आहे की, ”धनश्रीचा हा अचानक बदललेला लूक पवन सिंगसाठीच खास होता.”
ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
शोच्या सुरुवातीला पवन सिंगच्या फ्लर्टिंग स्वभावामुळे धनश्री थोडी नाराज दिसायची. पण हळूहळू त्यांच्या नात्यात समजूतदारपणा आला.तेवढंच नाही, पवनने जेव्हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धनश्री भर मंचावर रडताना दिसली.शोमधून तो गेल्यावर, धनश्री अनेकदा त्याला मिस करताना दिसली.