(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये पू (लहान करिना) ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज बग्गा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मालविकाने या वर्षी ऑगस्टमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.आई झाल्याची ही आनंदाची बातमी तिने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केली होती, आणि तेव्हापासूनच चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आता दशऱ्याच्या शुभमुहूर्तावर, मालविकाने तिच्या राजकुमारीचं नाव ‘महारा’ (Mahara) असं ठेवल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती पती प्रणव बग्गा आणि त्यांची लहान मुलगी दिसत आहे.
मालविका राज आणि तिचा पती प्रणव बग्गा यांनी त्यांच्या चिमुकलीसोबत दसऱ्याच्या दिवशी खास ट्विनिंग करत एक अविस्मरणीय क्षण साजरा केला.फोटोमध्ये तिघंही पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये एकसारखे दिसत होते, यात मालविका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये एक खास गोष्ट आहे ती म्हणजे,मालविकाने तिच्या लेकीच्या नावाचे लॉकेट तिने गळ्यात घातलं आहे. या खास क्षणांचे फोटो तिने पोस्ट केले असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या खास क्षणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने या फोटोंना एक कॅप्शन देखील दिले आहे. यात तिने लिहिले आहे, ”४० दिवसांची महारा, दसऱ्यासारख्या शुभ दिवशी आम्ही आमच्या लाडक्या गोंडस लेकीचं नाव अधिकृतपणे ठेवले आहे” असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी मालविका राज ही आज एक यशस्वी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते.तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती आणि तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या सुपरहिट चित्रपटातल्या छोटी पूजा (पू) या भूमिकेमुळे.
या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरीच वर्षं झाली असली, तरीही मालविकाने साकारलेली ‘छोटी पू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही तितकीच खास आहे. 2021 मध्ये तिने ‘स्क्वाड’ या अॅक्शन फिल्ममधून मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनयासोबत ती एक यशस्वी मॉडेलही आहे.मालविका आणि प्रणव बग्गा यांनी 2023 मध्ये लग्न केलं होतं. आता ते नव्या जबाबदारीसह “पॅरेंट क्लब” मध्ये सहभागी झाले आहेत, आणि सोशल मीडियावरून त्यांचा आनंद सर्वांशी शेअर करत आहेत.