(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
२०१४ मध्ये ‘यारियां’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्न करणारी रकुल 10 वर्षांपासून हिंदी आणि दक्षिण सिनेमांमध्ये सक्रिय आहे. दरम्यान, रकुल प्रीतने बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, तिने घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट गमावले आहेत.
नेपोटिझमवर रकुलचे स्पष्ट शब्द
हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. कंगना राणौत सारख्या अनेक सिनेतारकांनीही या इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे नवीन नाव जोडले जात आहे. नुकतीच रकुल रणबीर इलाबादियाच्या पॉडकास्टवर दिसली आणि तिथे तिने नेपोटिझमबद्दल मोठा खुलासा केला. ती म्हणाली की, “होय, मी देखील घराणेशाहीची शिकार झाली आहे. घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट माझ्या हातातून निसटले आहेत. पण त्याबद्दल रडत बसणाऱ्यांपैकी मी नाही. मी हार मानली नाही आणि काम शोधत राहिले आणि करत राहिले. मला वाटतं कदाचित मी त्या चित्रपटांसाठी बनवलेले नसावे. पण आता मला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही आणि मी स्वतःला नवीन कामाच्या संधींसाठी तयार करते आहे.” असे अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितले. रकुल प्रीतने नेपोटिझमवर आपले मत व्यक्त केले आहे. यावरून इंडस्ट्रीत बाहेरच्या लोकांसाठी खूप संघर्ष करावा लागतो हे सिद्ध होते.
हे देखील वाचा- मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाने करीना कपूर झाली दुःखी, मैत्रिणीसाठी केला मोठा त्याग
या चित्रपटात दिसणार रकुल
नुकतीच रकुल प्रीत साऊथचा सुपरस्टार कमल हासनच्या इंडियन 2 या चित्रपटात दिसली होती. याशिवाय रकुलचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार २’ मध्ये ही दिसणार आहे. रकुल या सिनेमात सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.