(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड इंडस्ट्रीचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. शाहरुख आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी 59 वर्षांचा झाला आहे. या खास प्रसंगी, सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, पण त्याच दरम्यान त्याचे ट्रोलर्सही सक्रिय झाले आहेत. शाहरुख खानला ट्विटरवरून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त, रेस्ट इन पीस सुरुख खान पहाटे X वर ट्रेंड करत आहे आणि हे सर्व सलमान खानच्या चाहत्यांमुळे घडले आहे. यांचे नक्की कारण काय आहे जाणून घेऊयात.
हे देखील वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर क्रिती सेनॉनने बॉयफ्रेंड कबीर बहियासोबतचे नाते केले जाहीर? फोटोची रंगली चर्चा!
SO SAD
REST IN PEACE SUARUKH KHAN
HBD SALMANs SON PRK pic.twitter.com/3iA5ocQNpu— Being Aryan (@thatbloodyguyy) November 2, 2024
सलमान खानच्या चाहत्यांनी शाहरुख खानला ट्रोल केले
सोशल मीडियावर दोन स्टार्सच्या चाहत्यांमध्ये भांडण होणे ही काही नवीन गोष्ट नाही आणि शाहरुख खान-सलमान खानच्या चाहत्यांमध्ये अनेकदा भांडणे झाली आहेत. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याला सतत शुभेच्छा देत आहेत. यानिमित्ताने त्याच्या अप्रतिम चित्रपटांतील दृश्येही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, मात्र यानिमित्ताने सलमान खानचे चाहते सक्रिय झाले आणि त्यांनी शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याने शाहरुखच्या वाईट चित्रपटांच्या काही क्लिप सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्या X (Twitter) वर व्हायरल केल्या आहेत. इतकेच नाही तर सलमानच्या चाहत्यांनी रेस्ट इन पीस सुरुख खान हा ट्रेंड सुरु करताच व्हायरल झाला आहे. ज्याच्या बदल्यात शाहरुखच्या चाहत्यांना सलमान खानच्या नावाने रेस्ट इन पीस ट्रेंडिंग देखील मिळाले. या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांनी ट्विटरवर खळबळ उडवून दिली आहे.
हे देखील वाचा – विद्या बालन की माधुरी दीक्षित? ‘भूल भुलैया 3’ चित्रपटासाठी कोणी घेतले सर्वाधिक मानधन
शाहरुख खान आणि सलमान खान चांगले मित्र आहेत
सलमान खान आणि शाहरुख खान हे बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते आहेत. शाहरुखला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते, तर सलमानला इंडस्ट्रीचा भाईजान म्हटले जाते. करण अर्जुन या चित्रपटात शाहरुख आणि सलमान पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. असा दावा केला जातो की काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते, परंतु आज त्यांच्यात चांगले संबंध आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाली तेव्हा सलमान त्याच्यासोबत उभा राहिला होता. यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा घट्ट झाली असून ती चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाली आहे.
कामाच्या आघाडीवर, शाहरुख खानचा ‘किंग’ पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये चित्रपगृहात दाखल होणार आहे. ज्याची चाहत्यांना खूप आतुरता लागून राहिली आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी हा एक सुपरहिट चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सुहाना खान व्यतिरिक्त अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहे. इतकंच नाही तर मुंज्या या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसलेला अभय शाहरुख खानच्या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो सुहाना खानसोबत दिसणार स्क्रीन शेअर करणार आहे.