(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
साडीतली साधी, संस्कारी आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे. कारण? तिने समुद्रकिनारी घातलेला स्विमसूट. साई पल्लवी आपल्या बहिणीसोबत म्हणजेच पूजा कन्ननसोबत बीच व्हेकेशनवर गेली होती. पूजाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात दोघी बहिणी मिळून समुद्रकिनारी धमाल करताना दिसतात. त्या फोटोंमध्ये साई पल्लवीने स्विमसूट घातला होता.
पण, काही सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी या फोटोंवर टीका केली आहे. काहींनी कमेंट्स केल्या आहेत एकाने म्हटले आहे, “जर साई पल्लवी स्लीव्हलेस आणि शॉर्ट ड्रेस घालून बीचवर जाईल, तर भारतीय संस्कृतीचं रक्षण कोण करेल?” तर दुसरा म्हणाला आहे, “हिचंही खरं रूप बाहेर आलं… पारंपरिक पेहराव फक्त दाखवण्यासाठी असतो!”. या ट्रोलिंगला उत्तर आता तिच्या चाहत्यांनी दिलं आहे. यावर अभिनेत्रीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून तीच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट केला आहे.
भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
साई पल्लवीला चाहत्यांचा पाठिंबा
एका चाहत्यांनी कमेंट केली आहे, “त्या काही कमेंट्ससाठी, लोक स्विमिंग करताना स्विमसूट घालतात!! लोकांना जे सोयीचं वाटतं ते ते घालू शकतात. हे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं थांबवा. प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती साधी आणि मितभाषीच आहे. आणि आम्ही तिचा सन्मान करतो. कारण ती एक चांगली व्यक्ती आहे.” एका युजरने ठामपणे उत्तर दिलं,”ती काय घालायचं ते तिचं स्वातंत्र्य आहे. पाण्यात पोहताना तुम्हाला काय अपेक्षित आहे? साडी घालावी? जरा विचार करा!” अशा कमेंट्स बघायला मिळत आहेत.
विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा
साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित भव्य चित्रपट रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या पौराणिक गाथेत रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे, तर यश रावणाची भूमिका साकारणार आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असून आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे