(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या ‘मानवत मर्डर’ सिरीचे प्रोमोशन करण्यास व्यस्त आहे. मराठीसह अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये आणि सिरीजमध्येही काम केले आहे. सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे. २०२४ हे वर्ष सईसाठी खूप खास ठरतंय, यामध्ये काही शंका नाही. सई ताम्हणकरच्या नव्या प्रोजेक्टची यादी न संपणारी आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘भक्षक’ आणि ‘अग्नी’ आता लवकरच ‘मानवत मर्डर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान या चित्रपटाचे अनेक पोस्ट सई सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.
सईने काढला मानेवर नवा टॅटू
सईने नुकताच तिच्या नव्या टॅटूचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरस शेअर केला आहे. हा टॅटो पाहून चाहत्यांचे लक्ष पूर्णपणे या टॅटू वर आहे. तसेच सई तिचा नवा ओटीटी चित्रपट ‘मानवत मर्डर’ यामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर आणि व्हिडीओ सई तिच्या इंस्टा अकाउंटला शेअर करताना दिसली आहे. तसेच या चित्रपटामध्ये सई सोबत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील दिसणार आहे. ‘मानवत मर्डर’ या चित्रपटामध्येही सईने जे पात्र साकारले आहे त्यामध्ये तिच्या मानेवर एक गोंधण आहे. तसेच तिच्यासह ते सोनालीच्या देखील मानेवर आहे.

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सईने शेअर केला टॅटूचा फोटो
सई ताम्हणकरने तिच्या मानेवर नवा टॅटू काढला आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या इंस्टा अकाउंटला ही पोस्ट शेअर केली असून ही बातमी दिली आहे. तसेच तिने या शेअर केलेल्या इंस्टा स्टोरीवर ‘इंकिंग अराउंड’ असे लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या नव्या टॅटूकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच, सईला टॅटो काढण्याची आवड आहे. याआधी सुद्धा तिने तिच्या खांद्यावर रोमन अंकाचा टॅटू काढला होता, जो पाहून चाहत्यांना तो खूप आवडला आणि त्यांनी सुद्धा हा ट्रेंड सुरु केला.
हे देखील वाचा- ‘नेपोटिझममुळे गमावले चित्रपट’, रकुल प्रीत सिंगने इंडस्ट्रीतील काळे सत्य केले उघड!
सईचे दिसणार या चित्रपटांमध्ये
सईच्या कामाबद्दल बोलायचे तर, तिचे आतापर्यंत ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’ हे दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत. लवकरच सई ‘अग्नी’, ‘ग्राऊंड झिरो’, ‘डब्बा कार्टेल’ या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी काळात ती कोणकोणते नवे प्रोजेक्ट करेल हे पाहण्यासाठी तिने चाहते उत्सुक आहेत.






