(फोटो सौजन्य-Instagram)
बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने त्याची भाची आणि अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्री हिला गेल्या वर्षी ‘फरे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. या चित्रपटातील अलिझेहच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अलीझेह अग्निहोत्रीनंतर आता सलमान खानचा भाचा अयान अग्निहोत्रीनेही फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने याची सुरुवात संगीत व्हिडिओपासून केली आहे. अलीकडेच, 26 वर्षीय अयानचा पहिला म्युझिक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याचा मामा सल्लू देखील त्याचा स्वॅग दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.
अयानचा म्युझिक व्हिडिओ आऊट
सलमान खानचा भाचा अयान अग्निहोत्री पायल देवच्या पार्टी फिव्हरमध्ये दिसला आहे. पायलने स्वतः या गाण्याला संगीत दिले आहे. म्युझिक व्हिडिओ आता नुकताच यूट्यूबवर आला आहे. सोशल मीडियावर पार्टी फिव्हरचा टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, “पार्टी फिव्हर सुरु आहे तर हा म्युझिक व्हिडिओ पाहायला विसरू नका.” असे लिहून त्याने हे सॉंग शेअर केले आहे.
सलमान खानच्या स्वॅगने चाहते खूश
अयान अग्निहोत्रीच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचा स्वॅग आणि डॅशिंग लुक दाखवताना दिसला आहे. त्याच्या स्वॅगने या म्युझिक व्हिडिओमधील आकर्षण वाढवले आहे. त्याला पाहून चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. मनीषा राणी आणि मनारा चोप्रा यांनी फायर इमोजीसह आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर एका यूजरने म्हटले की, “बॉलिवुडचा आकर्षक स्टार.” तर एकजण म्हणाला, “भाईचा स्वॅग जास्त आहे.” एका चाहत्याने त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटले आहे. अशा प्रकारे, म्युझिक व्हिडिओमध्ये भाईजानच्या एंट्रीने लोक उत्साहित आहेत.
कामाच्या आघाडीवर, बी-टाऊनचा ‘टायगर’ सलमान खान लवकरच सिकंदरच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर जबरदस्त ॲक्शन दाखवणार आहे. एआर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात सल्लू मियाँ पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत काम करताना दिसणार आहे. तसेच, सलमान आणि शाहरुखचा ‘टायगर वर्सेस पठाण’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.