फोटो सौजन्य - Social Media
गेल्या अनेक दशकांपासून अनेक Blockbuster चित्रपटांची यादी देणारा Salman Khan याने त्याच्या चित्रपट निवडीच्या पद्धतीबाबत खुलासा केला आहे. अशाच कौशल्यांमुळे तसेच पद्धतींमुळे आज सलमान Bollywood चा चेहरा म्हणून ओळखला जातो, या गोष्टी टाळता येत नाहीत. Salman नेहमीच त्याच्या हटके काम करण्याच्या शैलीमुळे चर्चेत येत असतो. यंदा त्याने केलेला खुलासा हा त्याच्या Script वाचण्याच्या पद्धतीबाबत आहे. सामान्यतः कलाकार एखादा चित्रपट साइन करण्यापूर्वी स्क्रिप्ट काळजीपूर्वक वाचतात, मात्र सलमानची पद्धत जरा हटके आहे. Salman सांगतो की “मी आजपर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. परंतु, त्यातील एकाही सिनेमाची स्क्रिप्ट मी आजपर्यंत वाचलेली नाहीये.”
Salman स्क्रिप्ट वाचत नाही तर तो सिनेमा समजून कसा घेतो?
Salman म्हणतो की,”मला Script वाचायला आवडत नाही. मला Script त्या Script च्या लेखकाकडून किंवा दिग्दर्शकाकडून ऐकायला आवडते.” तो म्हणतो की, “यातून मला चित्रपटामागे लेखकाचे काय Vision आहे? दिग्दर्शक या सिनेमाला कोणत्या दृष्टीने पाहतो? या गोष्टी कळतात.” सलमानचे म्हणने आहे की, “जर मी Script वाचून सिनेमाचा अंदाज घेतला तर कदाचित माझ्या मनात एक वेगळाच चित्रपट तयार होऊ शकतो आणि तो कदाचित दिग्दर्शक आणि लेखकाच्या कल्पनेच्या पलीकडे किंवा न जुळणारा असू शकतो.”
एकंदरीत, सिनेमा दिग्दर्शक आणि लेखकाच्या दृष्टीने समजण्यासाठी सलमान त्यांच्याच तोंडी सिनेमाची स्क्रिप्ट ऐकणे पसंत करतो. आजवर सलमानने अनेक सिनेमे केले पण त्यातील एकाही सिनेमाची स्क्रिप्ट त्याने वाचली नाही हे जाणून त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे तसेच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एखादा कलाकार मोठा तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते, हे सलमानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आणि नवनटांना प्रेरणा दिली आहे.
दरम्यान, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘Matrubhoomi: May War Rest in Peace’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती Salman Khan Films करत असून दिग्दर्शन Apoorva Lakhia करत आहेत. चित्रपटात Chitrangada Singh देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.






