(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या हे ग्लॅमर जगतातील चाहत्यांचे आवडते जोडीदार होते. मात्र काही काळ त्यांच्या विभक्त झाल्याची चर्चा होती. प्रदीर्घ काळापासून वेगळे होत असल्याच्या बातम्या येत असताना, या वर्षी जुलैमध्ये हार्दिक आणि नताशा यांनी एका निवेदनाद्वारे ते वेगळे होत असल्याची घोषणा केली. नतासा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दोघांनीही निवेदनात म्हटले होते की, त्यांनी त्यांचे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु गोष्टी होऊ शकले नाही. त्यामुळे दोघांनीही कठीण निर्णय घेतला.
नताशा स्टॅनकोविकने सांगितला प्रेमाचा अर्थ
विभक्त झाल्याच्या बातमीनंतर नताशा स्टॅनकोविच सर्बियाला गेली. त्याचवेळी हार्दिक पांड्याचे नाव ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्याशी जोडले जात होते. आणि आता याचदरम्यान, नताशाने एका पोस्टद्वारे प्रेमाचा खरा अर्थ सांगितला आहे. नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “प्रेम सहनशील आहे, प्रेम दयाळू आहे. ते द्वेष करत नाही, ते घमंडी नाही, तो इतरांचा अनादर करत नाही, तो स्वार्थी नाही. तो सहजासहजी रागावत नाही, तो चुका करतो आणि प्रेम देखील करतो. प्रेम वाईट गोष्टीत आनंद मनात नाही, परंतु नेहमी रक्षण करते, नेहमी आशा बाळगते, नेहमी धीर धरते.” अशी नोट अभिनेत्रींने शेअर कलेची आहे.
हे देखील वाचा- उर्वशी रौतेला पुन्हा झाली ट्रोल! हाताला कट लागला म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल, चाहत्यांनी पाठवली १,०,०००० गुलाब
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक का झाले वेगळे
काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, नताशा हार्दिक पांड्यासोबत ताळमेळ राखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टाईम्स नाउच्या वृत्तानुसार, हार्दिक स्वतःवर खूश होता आणि तो खूप दिखाऊही होता. नताशाला हे वागणं सहन होत नव्हतं. दोघांमध्ये खूप फरक आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यांनी हार्दिकसोबत समन्वय राखण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. म्हणून या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.