(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे जगभरात फॅन फॉलोअर्स जास्त आहेत. तो त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आहे. चाहते नेहमीच आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अलीकडेच बातमी आली होती की शाहरुख खानचा एक चाहता मन्नतच्या बंगल्याबाहेर त्याला भेटण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ थांबला आहे. आता या चाहत्याची इच्छा पूर्ण झाली असून शाहरुख खानने त्याची भेट घेतली आहे. शाहरुख खानच्या फॅन क्लबमधून एक फोटो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये शाहरुख खान त्याच्या जबरा फॅनला भेटताना दिसत आहे.
शाहरुख खानच्या फॅन्सचा फोटो व्हायरल होत आहे
झारखंडमधून आलेल्या मोहम्मद अन्सारीने शाहरुख खानबद्दल आपल्याला किती पॅशन आहे हे दाखवून दिले. आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी गेल्या ९५ दिवसांपासून तो मन्नतच्या बंगल्याबाहेर लक्ष ठेवून होता. अखेर मोहम्मद अन्सारीचे स्वप्न पूर्ण झाले आणि तो शाहरुख खानला भेटला. अभिनेत्याच्या फॅन क्लबच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान त्याचा चाहता मोहम्मद अन्सारीची भेट घेताना दिसत आहे.
हे देखील वाचा – नर्गिस फाखरीच्या आकर्षक पारंपारिक पोशाखाने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले ‘सुंदरा…’
हा चाहता झारखंडमधून शाहरुख खानला भेटण्यासाठी आला होता
नुकताच शाहरुख खानचा फॅन मोहम्मद अन्सारी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने झारखंडमधील काम आटोपल्यानंतर शाहरुख खानला भेटायला आल्याचे सांगितले. त्याला फक्त एकदा शाहरुख खानला भेटायचे आहे आणि त्याला भेटल्यानंतर परत जाईल. असे स्वप्न घेऊन हा चाहता मुंबईत पोहचला. आणि अखेर आपल्या आवडत्या स्टारच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोहम्मद अन्सारीचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा शाहरुख खानला समजले की त्याचा एक चाहता इतका वेळ वाट पाहत आहे, तेव्हा त्याने त्याला फोन केला आणि त्याची भेट घेतली.
हे देखील वाचा – बिग बॉसच्या घरात पक्षपात! व्हीव्हीयन डिसेना जिंकवण्यासाठी प्रयत्न सुरु, करणला केलं जातंय टारगेट
अभिनेत्याचा येणार आगामी चित्रपट
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा ‘किंग’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये चित्रपगृहात दाखल होणार आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी हा एक सुपरहिट चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सुहाना खान व्यतिरिक्त अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहे. इतकंच नाही तर मुंज्या या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसलेला अभय शाहरुख खानच्या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो सुहाना खानसोबत दिसणार स्क्रीन शेअर करणार आहे.