"२.३० मिनिट टाळ्या अन् standing ovation"; ‘सिंघम अगेन’ पाहून पृथ्वीक प्रताप भारावला, लेखकाचं केले तोंडभरून कौतुक
दिवाळीच्या दिवशी घरासोबतच अनेक चित्रपटगृह चमकताना दिसणार आहेत. बाजीराव सिंघम 10 वर्षांनंतर ॲक्शन थ्रिलर ‘सिंघम अगेन’द्वारे मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकताना दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून निर्माते प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही आहे. चाहत्यांना ते अनेक सुखाचे धक्के देताना दिसत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन मधील ‘जय बजरंगबली’ हे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. ज्या गाण्याला चाहत्यांन भार्भारीण प्रतिसाद दिला. आणि आता सिंघम अगेनचा टायटल ट्रॅकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सिंघम अगेन’ने ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला टक्कर दिली आहे. चाहत्यांना हा टायटल ट्रॅक जास्तच आवडणार आहे.
टायटल ट्रॅकने उडवली खळबळ
25 ऑक्टोबरला अजय देवगणने सिंघम अगेनच्या टायटल ट्रॅकचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. हा टायटल ट्रॅक संस्कृतमध्ये आहे, जो बाजीराव सिंघमच्या व्यक्तिरेखेला न्याय देईल. बर्फाळ टेकड्यांमध्ये अजय देवगण त्याच्या टीमसोबत पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. हा ट्रॅक कधी रिलीज होणार हे त्याने या टीझरद्वारे सांगितले आहे. ही पोस्ट पाहून चाहते हा टायटल ट्रॅक ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत.
हे देखील वाचा – ‘पुष्पा 2’ने रिलीजआधीच केली 1000 कोटींची कमाई? निर्मात्यांनी प्री-रिलीझ बिजनेसबाबत सोडले मौन!
गाणे उद्या रिलीज होणार आहे
सिंघम अगेनचा टायटल ट्रॅक २६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. टीझरसोबत अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विनाशम गोंधळ. सिंघम अगेनचा टायटल ट्रॅक उद्या प्रदर्शित होईल.” हा टीझर पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एका यूजरने लिहिले की, सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट सर. एकाने अजय देवगणला मेगास्टार म्हटले.” तर “बॉस पोलिसांच्या गणवेशात परत आला आहे,” असे देखील चाहत्यांनी हे गाणे रिलीज होण्याआधीच प्रतिसाद दिला आहे. आणि भरभरून कंमेंट केल्या आहेत.
हे देखील वाचा – मनीष पॉलने दिवाळीपूर्वीच खास विधी केला पूर्ण, अमिताभ बच्चन यांचे केबीसीच्या सेटवर घेतला आशीर्वाद!
सिंघम अगेनमध्ये झळकणार हे कलाकार
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी रोहित शेट्टीने सिंघम अगेनमध्ये असे ट्विस्ट ठेवले आहेत, जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील पात्रांना रामायणातील पात्रे दाखवण्यात आली आहेत, जी ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत होती. या ॲक्शन थ्रिलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. अर्जुन कपूर रावणाच्या (खलनायक) भूमिकेत दिसणार आहे, तर अजय देवगण रामच्या भूमिकेत आणि करीना कपूर सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.