(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हाने यावर्षी 23 जून रोजी तिचा जोडीदार झहीर इक्बालसोबत लग्न केले. हा आंतरजातीय विवाह होता, त्यानंतर अनेकांनी सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कुटुंबावर टीका केली होती. हे सर्व इतके ट्रोल झाले की लग्नाचे फोटो पोस्ट करताना जोडप्याला कमेंट सेक्शन बंद करावे लागले. यानंतर सोनाक्षी लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव साजरा करताना दिसत आहे. अभिनेत्रीने पती झहीर इक्बाल आणि गणपतीसह एक सुंदर कॅप्शन लिहून पोस्ट शेअर केली आहे. ज्याकडे सगळ्या चाहत्यांच्या नजर त्याच्याकडे वेधल्या गेल्या आहेत.
सोनाक्षीने इस्लाम धर्म स्वीकारला नाही
आता अनेकदा सोनाक्षीच्या पोस्टमध्ये ती तिच्या पोस्टमधून धर्माची रेषा पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. सोनाक्षी आणि झहीर यांचे सिव्हिल मॅरेज झाले होते. ही अभिनेत्री हिंदू आहे आणि तिने इस्लाम न स्वीकारता झहीरशी लग्न केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमधील कॅप्शनने वेधले लक्ष
आता मुंबईत सर्वत्र गणपती उत्सव साजरा होताना दिसत आहे. तसेच सोनाक्षी आणि झहीर हे जोडपंही मागे न राहता हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. सोनाक्षीने पूजा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिचे कॅप्शन. अभिनेत्रीने लिहिले, “जेव्हा जोडीदार एकमेकांच्या भावना आणि विश्वासाचा आदर करतात तेव्हा प्रेम आणखी वाढते. लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती. सोनाक्षीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. एकीकडे काही लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत तर दुसरीकडे आता कुठे गेले लव्ह जिहादची चर्चा करणारे? असे देखील म्हणत आहेत.
हे देखील वाचा- ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेताच संग्रामने दिली अरबाजला धमकी, म्हणाला…
शेअर केलेल्या पोस्ट मध्ये अभिनेत्री सोनाक्षीने निळ्या रंगाचा सुंदर सलवार सूट परिधान केला आहे. झहीरही तिच्यासोबत मॅचिंग निळ्या आणि पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसला आहे. दोघांनी मिळून आरती केली. सोनाक्षी सिन्हाने पारंपारिक लग्नाऐवजी अत्यंत साधे लग्न निवडले. अभिनेत्रीने साध्या पद्धतीत केलेलं लग्न चाहत्यांना खूप आवडले आणि त्या दोघांनाही अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटीनि शुभेच्छा दिल्या