काही दिवसांपूर्वी ही बातमी समोर आली होती की, सुपरस्टार अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी स्त्री 2 चित्रपटामध्ये कॅमिओ दिसणार आहे. आता स्त्री 2 चित्रपटगृहात दाखल झाला आहे, ही बातमी देखील खरी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटात या अभिनेत्याची एंट्री दाखवली गेली आहे. पण यासोबतच ‘स्त्री 2’ मध्ये हे देखील समोर आले आहे की या हॉरर कॉमेडी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात अक्षय महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
अक्षयचा दिसणार खतरनाक लुक
14 ऑगस्टच्या संध्याकाळच्या शो सह ‘स्त्री 2’ मोठ्या पडद्यावर दाखल करण्यात आला. चित्रपटाची कथा आणि स्टारकास्टच्या अप्रतिम अभिनयाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. याशिवाय अक्षय कुमारच्या कॅमिओनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्त्री 2 च्या शेवटी, अक्षय सरकटेच्या आत्म्यात प्रवेश घेतो आणि यामुळे तो एका भयानक राक्षसाच्या रूपात बदलतो हे दाखवण्यात आले आहे. हे दृश्य पाहता, हे स्पष्ट होते की अक्षय स्त्री ३ मध्ये नक्की धमाका घालताना दिसणार आहे.
Akshay Cameo ❤️🔥#Stree2 pic.twitter.com/Zj7T8u8SIr
— Good context 🙂 (@ShoryaR80265848) August 14, 2024
चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद
अक्षय कुमारच्या कॅमिओसोबतच सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, ‘काय सिनेमा बनवला आहे भाऊ. मजा आली. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी उत्तम काम केले आहे. सर्व कॅमियोही जबरदस्त आहेत.’ दुसऱ्या एका यूजरने ‘श्रद्धा कपूरची एन्ट्री जबरदस्त आहे’ असे लिहिले, तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘कॉमेडी मस्त आहे. थिएटरमध्ये सगळे हसत होते. पंचलाईन्सही अप्रतिम आहेत.’ असा प्रतिसाद चाहत्यांकडून मिळाला आहे.
हे देखील वाचा- हार्दिक पांड्या डेट करीत असणारी विदेशी सिंगर कोण? जाणून घ्या भारतीय मूळ असलेल्या ब्रिटीश गायिकेची पार्श्वभूमी
अक्षयचा खेल खेल में झाली रिलीज
‘स्त्री 2’ मधील कॅमिओशिवाय अक्षय कुमार आजपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खेल खेल में’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून यामध्ये अक्षयसोबत फरदीन खान, तापसी पन्नू, आदित्य सेहल, प्रज्ञा जैस्वाल, वाणी कपूर आणि एमी विर्क हे कलाकार दिसणार आहेत.