फोटो सौजन्य - Social Media
मनोरंजन, आनंद आणि गौरवाचा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात चित्रपटातील प्रमुख कलाकारांनीही हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांनी डिलिव्हरी पार्टनर्सशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या प्रसंगी स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रोहित कपूर हे देखील उपस्थित होते. त्यांनी डिलिव्हरी पार्टनर्सच्या अथक परिश्रमांचे आणि ग्राहकांपर्यंत वेळेत सेवा पोहोचवण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. तसेच स्विगीच्या यशामध्ये डिलिव्हरी पार्टनर्सची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान डिलिव्हरी पार्टनर्सना चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी मिळाली. दैनंदिन धावपळीच्या कामातून थोडा विरंगुळा मिळाल्याने सहभागी झालेल्या अनेकांनी आनंद व्यक्त केला. कलाकारांसोबत संवाद साधण्याची आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला. डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामाची दखल घेत त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ही स्विगीची पुढाकाराची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. कंपनीकडून अशा उपक्रमांद्वारे कर्मचाऱ्यांप्रती आणि डिलिव्हरी पार्टनर्सप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या विशेष प्रदर्शनामुळे डिलिव्हरी पार्टनर्सना केवळ मनोरंजनाचा आनंदच मिळाला नाही, तर त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात असल्याची जाणीवही झाली. त्यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.






