(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या महिन्यात, चित्रपटसृष्टीतून अनेक मोठमोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ज्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी अजूनही शोकात आहे. आणि आता त्यातून बाहेर पडतच असताना आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आता, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेता अभिनयने या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनयने तमिळ सुपरस्टार धनुषसोबत त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
अभिनयच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनय फक्त ४४ वर्षांचा होता आणि त्याचे एवढ्या कमी वयात जाण्याने चित्रपटसृष्टी आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. असे वृत्त आहे की, सोमवार, १० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता अभिनयने अखेरचा श्वास घेतला. तसेच अभिनेता यकृताशी संबंधित आजाराशी ग्रस्त होता.
अभिषेक बच्चनवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; म्हणाला, ”त्यांचा आशीर्वाद..”
अभिनयचा मृत्यू कशामुळे झाला?
अभिनय अनेक दिवसांपासून आजारी होता. तो किडनी आणि यकृताशी संबंधित आजारांशी झुंजत होता. अभिनेता गंभीर यकृताच्या संसर्गाने ग्रस्त होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. या आजारावर तो उपचार घेत होता, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभिनयच्या यकृताच्या संसर्गावर उपचार करणे महागडे होते, त्यामुळे खर्च भागवणे कठीण झाले. परिणामी, अभिनेत्याने सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन केले. या कठीण काळात अनेक कलाकार त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले, परंतु अभिनेत्याला वाचवता आले नाही.
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेग्नंसीमध्येही केले ‘Item Song’, शूटिंगदरम्यान झालेला मनोरंजक किस्सा
धनुषसोबत अभिनयात पदार्पण
सुपरस्टार धनुषनेही अभिनयला मदतीचा हात पुढे केला. त्याने ५ लाख रुपये देणगी दिली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अभिनयच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात धनुषच्या चित्रपटाने झाली. ४४ वर्षीय अभिनेत्याचा पहिला चित्रपट “थुल्लुवधो इलामई” होता. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात धनुष आणि अभिनेत्री शेरीन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यामुळे धनुषसोबतच त्याच्या अभिनयालाही ओळख मिळाली.
त्यानंतर अभिनयला जंक्शन (२००२), सिंगारा चेन्नई (२००४) आणि २००५ मधील ‘पोन मेघलाई’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहिले गेले. परंतु, त्यानंतर त्याने फक्त सहाय्यक भूमिका केल्या. त्याचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि त्याने चेन्नईमध्येच शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांसह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.






