(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा चित्रपट १९४६ साली झालेल्या ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ आणि ‘नोआखली दंगल’ या ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता आणि कोलकात्यामध्ये १६ ऑगस्ट रोजी नियोजित ट्रेलर लाँच अचानक रद्द करण्यात आले होते. मात्र आता अनधिकृत बंदी असूनही, हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाल्यानंतर जवजवळ एक आठवडा म्हणजे १३ सप्टेंबर रोजी कोलकात्यामध्ये त्याचे पहिले प्रदर्शन होणार आहे.
या चित्रपटाशी संबंधित वाद
सुरुवातीला कोलकातामधील एका प्रमुख चित्रपट साखळीने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच रद्द केला होता. त्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न मध्येच थांबवण्यात आला.
अग्निहोत्री आणि अभिनेत्री-निर्माती पल्लवी जोशी यांच्या मते, “राजकीय दबाव आणि धमकी”मुळे राज्यात या चित्रपटावर “अनधिकृत बंदी” लादण्यात आली.
‘द बंगाल फाइल्स’ने सहाव्या दिवशी किती कमाई केली?
बागी ४ च्या तुलनेत ‘द बंगाल फाइल्स’ची स्थिती खूपच वाईट आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ६ दिवसांनंतर जेमतेम १० कोटींचा आकडा ओलांडला आहे. सॅकॅनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने मंगळवारपर्यंत ९.२५ कोटी रुपये कमावले होते.
बुधवारी, या चित्रपटाने फक्त १ कोटी रुपये कमावले आहेत, त्यामुळे त्याचे सहा दिवसांचे कलेक्शन १०.२५ कोटी रुपये झाले आहे. विवेक अग्निहोत्री यांनीही त्याचे खूप प्रमोशन केले होते परंतु ते प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरले.
९ मुलांच्या जन्मनंतर ५२ वर्षीय गायिकेचा घटस्फोट, २९ व्या Anniversary आधीच पत्नीने धक्कादायक सरप्राईज
‘बागी ४’ आणि ‘द बंगाल फाइल्स’मध्ये कोण आघाडीवर?
‘बागी ४’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन 8 दिवस झाले आहेत. दोन्ही चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, बागी ४ ने स्पष्टपणे बाजी मारली आहे. टायगर श्रॉफ स्टारर हा चित्रपट ३२ कोटींच्या कलेक्शनसह द बंगाल फाइल्सच्या पुढे आहे. आता हे दोन्ही चित्रपट त्यांच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी कसे काम करतात हे पाहणं बाकी आहे.