फोटो सौजन्य - Social Media
2024 वर्षाला निरोप देताना अनेक कलाकारांनी हे वर्ष खास केले आहे. कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तर, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारे मराठी मधले अनेक चित्रपट चर्चेत देखील आले आहेत. अश्यातच निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केली पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाययेस्ट ग्रोसिग फिल्म ठरले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. जणूं घेऊयात हे दोन चित्रपट कोणते आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशीने निर्माता म्हणून 2024 वर्षात “नाच गं घुमा” चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला सोबतीने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हाऊसफुल्लही झाला. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळवलं. पुढे स्वप्नीलने बहुचर्चित “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर केलं पण सोबतीने चित्रपटगृहात सगळ्यात जास्त दिवस हा चित्रपट देखील राहिला. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
स्वप्नील कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि अश्यातच पुन्हा एकदा स्वप्नील ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काही दिवसापूर्वी स्वप्नीलने निर्माता म्हणून अजून एका चित्रपटाची घोषणा केली असून “सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी “सुशीला सुजीत” या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठीमधील बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
वर्ष संपताना स्वप्नील जोशी हा या वर्षातला सगळ्यात हाययेस्ट ग्रोसिग फिल्म देणारा निर्माता आणि अभिनेता ठरला आहे. आगमी वर्षात मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे. तो लवकरच गुजराती चित्रपट ‘शुभचिंतक’ मध्ये दिसणार असून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.