"मी स्वतः माझ्या मुलीचं संगोपन करणार...", दीपिका पादुकोणने लेक दुआच्या संगोपनासाठी घेतला महत्वाचा निर्णय
बॉलिवूडमधलं स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीर यांनी लेकीचं स्वागत केलं. हे दोघंही सध्या तिला वेळ देण्यात व्यग्र आहेत. Kalki 2898 AD च्या ग्रँड सक्सेसनंतर, चाहते आता दीपिका पदुकोणच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण दीपिकाच्या नव्या वक्तव्यानंतर चाहत्यांना कल्की 2 साठी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे कारण अभिनेत्रीच्या कमबॅकला वेळ लागणार आहे आणि तिनेच याचा खुलासा केला आहे.
‘कल्की २’ ची शूटिंग २०२५ मध्ये सुरु होणार अशी सोशल मीडियावर चर्चा होत होती. पण तुर्तास आता तसं होताना दिसणार नाही. दीपिका पदुकोणने तिची लेक दुआमुळे तूर्तास परत न येण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ‘कल्की २’ चे शूटिंग लांबणीवर पडणार आहे. नुकतेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मीडियाला आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात, जोडप्याने त्यांच्या मुली दुआची पापाराझींशी ओळख करून दिली. मात्र, या काळात त्यांना फोटो क्लिक करण्याची किंवा व्हिडिओ शूट करण्याची परवानगी नव्हती.
मराठी सेलिब्रिटींचा प्राजक्ता माळीला “फुल्ल ऑन सपोर्ट…”, “जाहीर निषेध” म्हणत शेअर केल्या पोस्ट
दरम्यान, या कार्यक्रमात दीपिकाला तिच्या कमबॅक आणि ‘कल्की २’ बद्दल विचारण्यात आले. यावेळी दीपिकाने सांगितले की, सध्या माझी प्राथमिकता (First Priority) बेबी दुआच असेल. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका अद्याप तिच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग सुरू करणार नाही. कारण आपल्या मुलीचे संगोपन कोणत्याही आयाने करावे असे तिला वाटत नाही. दीपिका म्हणाली, “माझ्या आईने मला जसे मोठे केले आहे, तसंच मी माझ्या मुलीचे संगोपन करणार आहे.”
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याने बायकोला दिलं स्पेशल गिफ्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला…
८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिका आणि रणवीरने लेक दुआचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. खुद्द दीपिका-रणवीरने चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. यानंतर, नोव्हेंबरमध्ये दोघांनीही इन्स्टा पोस्ट शेअर करत चाहत्यांना लेकीची छोटीशी झलक दाखवत, तिचं नाव सांगितलं आणि तिच्या नावाचा अर्थ सांगितला. दीपिका आणि रणवीरने लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. “दुआ पादुकोण सिंह… ‘दुआ’ म्हणजेच प्रार्थना…” असा नावाचा अर्थ सांगितला होता. दीपिकाने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. या जोडप्याचे चाहते दुआच्या पहिल्या झलकची प्रतीक्षा करत आहेत.