फोटो सौजन्य: गुगल
लाईट्स कॅमेरा अॅन्ड अॅक्शन या शब्दांच अनेकांना आकर्षण असतं. काही जण या आकर्षणाला बळी पडतात तर काही या मोहजालातून तरुन यश मिळवताही पण हे यश मिळवणं सोपं आहे का तर नाही. झमगत्या या दुनियेची काळी बाजू अनेक कलाकारांनी आता पर्यंत मांडली आहे. तुमच्या किती टॅलेंट आहे यापेक्षा ही तुम्ही दिसता कसे हे जास्त जज केलं जातं. याच बॉडीशेमिंग प्रकरणाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध कॉमेडीयन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठ्य़ा प्रमाणात बॉडीशेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. काय म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री जाणून घेऊयात..
आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे कॉमेडीयन क्वीन अर्चना पुरण. अर्चनाने आज प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं ते तिच्या विनोदाने. मात्र सर्वांना हसवाण्याऱ्या या अभिनेत्रीला लहानपणापासून तिच्या दिसण्यावरुन टीका केली जात होती. लहानपणापासून अर्चनाला बॉडी शेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. याबाबतचा किस्सा तिने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. अभिनेत्री अर्चना पुरण म्हणाली की, 26 इंच कंबर असूनही मला मी कायमच जाड आहे, असं वाटायचं. याचं कारण म्हणजे लहानपणापासून माझ्यावर बिंबवलं गेलं होतं की, मी जाड आहे. इंड्स्टीत देखील याहून काही वेगळी वागणूक मिळाली नाही. अनेक आणि रियालिटीशो मधून अर्चना प्रेक्षकांच्या भेटीस आली मात्र तिच्या दिसण्याची चेष्टा केली गेली. ही बाई नाही तर पुरुष आहे, अशा कडव्या टोमण्यांना तिला सामोरं जावं लागलं आहे. अर्चना पुढे असंही म्हणाली की, टोमणे पचवावे लागत असले तरी,यामुळे मी अनेदा मानसिक नैराश्याला बळी पडले आहे.
अर्चना मुलाखतीत असंही म्हणाली की, कॅमेरासमोर मी प्रेक्षकांना हसवलं आहे मात्र ऑफ कॅमेरा खऱ्या आयुष्यात मी अनेकदा रडली आहे. अनेकदा शोमध्ये तिच्या हसण्याबाबत आणि दिसण्याबाबत खिल्ली उडवली गेली आहे. सोशल मीडियावर देखील युजर्स सेलिब्रिटींना ट्रोल करतात नाही म्हटलं तरी याचा वाईट परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो, आणि सिने इंड्स्ट्रीची ही सर्वात वाईट बाजू असल्याचं तिने सांगितलं आहे.
अर्चनाने अनेक वर्ष इंड्स्ट्रीत काम केलं पण तिला लोकप्रियता मिळली ते ‘द कपिल शर्मा शो’ मुळे. सिने इंड्स्ट्रीत अनेक अभिनेत्री या काल आज आणि उद्याही या बॉडीशेमिंगच्या त्रासा बळी पडणार आहे. अभिनेत्रीचं सौंदर्य म्हणजे ती बारिक असणं, गोरी दिसणं, उंच असणं हसाताना तिच्या हसण्याचा आवाज न येणं अशा चुकीच्या समजुतीमुळे अनेक महिला कलाकार नैराश्यात जातात. अर्चनाने सांगितलेल्या या अनुभावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्की.