(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी आमिरच्या चित्रपटाला बकवास म्हटले आहे. ते म्हणाले की त्यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. त्यांचे हे वक्तव्य ऐकून आता नेटकरी संपातले आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ते असे का म्हणाले आणि काय आहे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊयात.
योगराज सिंह यांनी ‘तारे जमीन पर’ बद्दल सांगितले
यूट्यूबवरील एका चॅनेलशी झालेल्या संभाषणादरम्यान, योगराज सिंह यांनी मुलांच्या संगोपनाबद्दल त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले की मूल तेच बनणार जे वडील सांगणार पुढे ते म्हणाले, ‘योगराज सिंह पुढे म्हणाले, मुलगा तेच बनेल जे वडिलांना हवे आहे. यावर त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही तारे जमीन पर चित्रपट बघितला आहे का?. यावर ते म्हणाले की, मी तो चित्रपट बघितला आहे खूप जास्त वाहियात आहे. मुळात म्हणजे मी असे चित्रपट बघतच नाही. युवराज सिंह याच्या वडिलांनी थेट आमिर खान याच्या चित्रपटाला वाहियात म्हटले आहे आणि असे चित्रपट ते पाहत नसल्याचे सांगितले.
गालावर खळी, दिलखुलास हास्य…; मिसेस चांदेकरचे साडीतले निस्सिम सौंदर्य पाहिलंत का?
क्रिकेटर युवराज सिंह याला रोलर स्केटिंगमध्ये आवड होती. त्याला यातच आपले करिअर करायचे होते. मात्र, युवराजने क्रिकेटर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि तो क्रिकेटरच बनला. युवराजचे स्केट्स त्याच्या वडिलांनी फेकून देखील दिले होते. युवराज सिंह आज अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. युवराज जास्त वेळ विदेशात घालवताना दिसतो.
२००७ मधील आमिर खानचा चित्रपट
आमिर खानचा हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या ईशान अवस्थीची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे. त्याला अभ्यासात अडचण येत होती, त्यानंतर मुलाच्या कुटुंबाने त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. या चित्रपटात आमिर खानने एका शिक्षकाची भूमिका साकारली होती. ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट त्या वर्षातील सुपरहिट चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खान आणि अमोल गुप्ता यांनी केले होते. या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. याशिवाय, हा चित्रपट ऑस्करचा भागही बनला.
या दिवशी फक्त ९९ रुपयांत पहा तुमचा आवडीचा चित्रपट; हे सिनेमागृह मनोरंजन करण्यासाठी सज्ज!
या चित्रपटाचा सिक्वेल २०२५ मध्ये प्रदर्शित होईल
तसेच, ‘तारे जमीन पर’चा ‘सितारे जमीन पर’ हा सिक्वेल प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता पण आता हा चित्रपट २०२५ च्या मध्यात प्रदर्शित होणार आहे. सितारे जमीन पर मध्ये नवीन पात्रे असतील आणि कथा देखील तारे जमीन पर पेक्षा खूप वेगळी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.