बिग बॅास ओटीटी 2 चा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या अडचणीत आला आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीरपणे रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.
[read_also content=”बोल्ड कपडे घातल्याबद्दल उर्फी जावेदला अटक? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/urfi-javed-aka-uorfi-arrested-for-her-bold-clothes-police-officers-take-her-into-custody-video-goes-viral-nrps-477172.html
नोएडा आणि एनसीआरच्या इतर शहरांमध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याबद्दल आणि त्यासाठी परदेशी मुलींना आमंत्रित केल्याबद्दल प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव यांच्यासह सहा नाव आणि काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध सेक्टर-49 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएफए या संस्थेने तक्रार दाखल केली होती की, एल्विश यादव नावाचा यूट्यूबर त्याच्या टोळीसह सापाचे विष आणि जिवंत साप पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून काही जणांना अटक केली. घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बदरपूर येथील राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. झडती घेतली असता राहुलच्या कमरेला लटकलेल्या पिशवीत सापाच्या विषाने भरलेली प्लास्टिकची बाटली सापडली. प्रत्येकाच्या जवळ नऊ जिवंत साप आढळले. ज्यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, एक घोड्याच्या शेपटीचा साप आणि दोन दोन डोकी असलेल्या सापांचा समावेश आहे.
एल्विश यादव हा एक प्रसिद्ध YouTuber आणि सोशल मीडिया इन्फुएन्सर आहे. 2016 मध्ये त्याने यूट्यूबचा प्रवास सुरू केला, एल्विशचे YouTube वर वेगवेगळे 3 चॅनेल आहेत. सर्व चॅनेलवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ‘Elvish Yadav Vlogs’ वर तो रोजचे अपडेट Vlog शेअर करतो, तर ‘Elvish Yadav’ वर तो त्याच्या शॉर्ट फिल्म अपलोड करतो. एल्विश यादव सेलेब्सचे रोस्टिंग व्हिडिओ देखील बनवतो, ज्यासाठी तो सर्वात प्रसिद्ध आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 13 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. एल्विश यादव बिग बॉसचा विजेता ठरला आहे. या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड स्पर्धकाने विजेत्याची ट्रॉफी जिंकली आहे.






