‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट २४ जून रोजी रिलीज होणार आहे. अभिनेता वरुण धवन , कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu kapoor) यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. करण जोहर या चित्रपटाचा (karan Johar) निर्माता आहे. पण ‘जुग जुग जियो’ चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग कोर्टामध्ये करण्याचा आदेश रांची कोर्टानं दिला आहे.
रांचीमधील लेखक विशाल सिंहनं धर्मा प्रोडक्शनवर कथा चोरण्याचा आरोप लावला आहे. विशाल सिंहनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रांची कोर्टाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात त्याचे स्क्रीनिंग करण्याचा आदेश दिला आहे.
[read_also content=”भुवनेश्वर कुमार ठरला सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय गोलंदाज https://www.navarashtra.com/sports/bhuvneshwar-kumar-became-first-indian-baller-to-get-man-of-the-match-award-for-maximum-time-nrsr-294781/”]
रांची येथील लेखक विशाल सिंहनं आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची कथा ही त्याच्या बन्नी रानी कथेसारखी आहे. विशाल सिंहची कथा ही परवानगीशिवाय आणि क्रेडीट न देता वापरण्यात आली आहे, असं विशालचं मतं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, असंही विशालनं याचिकेत म्हटलं आहे. विशालनं चित्रपटाच्या निर्मात्यांकडे दीड कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.
कोर्टामध्ये ‘जुग जुग जियो’चं स्क्रीनिंग २१ जून रोजी होणार आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन निर्मात्यांनी केले आहे की नाही, याबाबत चित्रपट पाहिल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पक्षांची बाजू कोर्टात मांडण्यात येणार आहे.