Gautami Patil Krushna Murari Song Poster Released
गौतमी पाटील(Gautami Patil) आणि वाद हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम असेल तिथे वाद हे समीकरण झाले आहे. आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौतमी पाटीलने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यासोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रीतही आता गौतमी पाटीलचं नाव चर्चेचा मुद्दा ठरला आहे. कायमच आपल्या डान्सने चर्चेत राहणाऱ्या गौतमीने गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर एका नवीन गाण्याचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अद्याप हे गाणं रिलीज झालं नसून गाण्याचा लवकरच टीझर रिलीज होणार आहे.
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी”या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याचे प्रस्तुतकर्ते साईरत्न एंटरटेनमेंट असून गाण्याची निर्मिती संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर यांनी केली आहे. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर आणि करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे. “नवे वर्ष, नवी सुरुवात, नव्या यशाची, नवी रुजवात गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” ही माझी पहिलीच गवळण मी घेवून येत आहे… लवकरचं!” असं तिने कॅप्शन गाण्याचं पोस्टर शेअर करताना दिलं आहे.
कोण आहे ‘तारक मेहता…’ मालिकेतली नवी दयाबेन? टीव्ही अभिनेत्रीचा सेटवरील फोटो व्हायरल
गौतमी तिच्या पहिल्या गवळण गाण्याबद्दल सांगते की, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतच शेअर केल आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीज़र ३ एप्रिलला प्रदर्शित होईल.” दरम्यान, चाहते गौतमीच्या पहिल्या गवळणीसाठी उत्सुक असल्याचे सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे. गौतमीने शेअर केलेल्या पोस्टरवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.