आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान (loksabha election) पार पडत आहे. सकाळपासून बॅालिवूड सेलेब्रिटीही मतदान करताना दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर, राजकुमार राव, फरहान अख्तर, झोया अख्तर, परेश रावल, तब्बू आणि अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत मतदान केलं. या सगळ्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण गरोदर असून देखील तिचा पती रणवीर सिंगसह मतदान करण्यासाठी आली. यावेळी गर्दीत रणवीर तिची काळजी घेताना दिसला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नेटकरी दिपीकावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
[read_also content=”अभिनेत्री यामी गौतमच्या घरी बाळाचं आगमन, मुलाचं नावही शेअर केलं! https://www.navarashtra.com/movies/yami-gautam-and-aditya-dhar-blessed-with-baby-boy-nrps-535524.html”]
रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणची किती काळजी घेतो हे सर्वांनाच माहीत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी ती वांद्रेतील एका मतदान केंद्रावर आली तेव्हा रणवीर सिंगने तिला कारमधून अतिशय काळजीपूर्वक खाली उतरवले आणि गर्दीच्या दरम्यान तिचा हात धरला.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिका पदुकोण स्पॉट झाली होती तेव्हा लोकांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. प्रियांका चोप्राप्रमाणेच ती सुद्धा सरोगसीच्या माध्यमातून बाळाचं स्वागत करणार असल्याचे अनेक यूजर्सनी म्हणाले होते. मात्र, दरम्यान, दीपिका पदुकोणच्या या ताज्या फोटोंनी सगळ्यांची तोंड बंद केली आहे.