(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘नशीबवान’ याचा नवा प्रोमो १५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . मालिकेच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यावर कमेंट करत अनेकांनी कौतुक केले आहे. मालिकेतआदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची या मालिकेत मुख्य भूमिका असून त्यांच्या पात्रांची नावे रुद्र आणि गिरीजा अशी आहेत. पहिल्या भागात या पात्रांची ओळख करुन देण्यात आली आहे.
मालिकेत नागराज घोरपडे आणि गिरीजा यांच्या भूतकाळातील घटनाही दाखवण्यात आल्या आहेत. गिरीजाच्या आई-वडिलांचा खून नागराजने केलेला असतो आता आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे.
‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार
नशीबवानच्या या प्रोमोमध्ये रूद्रची आणि नागराजची पत्नी वासंती एका घाटावर दोन फोटोंसमोर श्राद्धविधी करत असते. ते गिरीजाच्या आई वडिलांचे फोटो असतात, ट्वीस्ट असा की, नागराजने ज्यांना मारलं त्यांचं श्राद्ध त्याची पत्नी वासंती करते आहे. वासंती त्या फोटोंकडे पाहून म्हणते की, ‘देवकी तुला आणि तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने मारलं, तुझी मुलगी जिवंत आहे. ती जिथे कुठे असेल तिथे देवी आईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे.’ यावेळी फ्लॅशबॅकमध्ये दाखवले की, देवकीच्या मुलीच्या कानाजवळ एक काळ्या डागाची खूण असून हीच खूण गिरीजाच्या कानाजवळही आहे.
‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप
हे श्राद्धचे विधी करताना तिथे गिरीजी येते. यावेळी वासंतीचा पाटावरून तोल जातो आणि गिरीजा तिला सावरण्यासाठी पुढे येते, तेव्हा तिच्या हातातले फुल त्या फोटोंसमोर पडते.त्याचवेळी नेमके कावळे पिंडाला शिवतात. या प्रोमोत सांगितले आहे की 25 वर्षात पहिल्यांच पिंडाला कावळा शिवला आहे. यानंतर वासंती फोटोंसमोर हात जोडून म्हणते की, ‘म्हणजे नशिबाचा खेळ सुरू झाल आहे.’