(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा परतण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी या प्रसिद्व शो चा १९ वा सीझन सुरु होणार आहे, जो २४ ऑगस्टपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. नंतर तो कलर्स टीव्हीवर देखील प्रसारित केला जाणार आहे. ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आतापर्यंतचा सर्वात लांब सीझन ‘बिग बॉस १९’ बद्दल अशी चर्चा आहे की हा आतापर्यंतचा सर्वात लांब सीझन असेल, जो सुमारे ५ महिने चालेल.
नवीन स्पर्धक आणि नवीन फॉरमॅट
यावेळी शोमध्ये १५ ते २० नवीन स्पर्धक या नव्या सीझन मध्ये सहभागी होणार आहेत. गौरव तनेजा आणि अपूर्व मुखिजा सारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना देखील संपर्क साधण्यात आला आहे. फॉरमॅटमध्ये काही बदल देखील दिसून येत आहेत. तसेच आता यांच्यासह आणखी कोणत्या कलाकार पाहायला मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
भारताला ऑस्कर जिंकून देणाऱ्या MM Keeravani यांच्या वडिलांचे निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
आधी ओटीटी नंतर टीव्ही
हा सीझन प्रथम डिस्ने प्लस हॉटस्टारवर दाखवला जाणार आहे, त्यानंतर तो टीव्हीवर रिलीज होणार आहे. म्हणजेच, यावेळी प्रेक्षकांना प्रथम मोबाईलवर आणि नंतर टीव्हीवर एपिसोड पाहायला मिळणार आहे.
सलमान खान संपूर्ण सीझन होस्ट करणार नाही
यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे सलमान खान संपूर्ण सीझन होस्ट करणार नाही. अभिनेता फक्त सुरुवातीचे काही आठवडेच दिसणार आहे आणि नंतर त्यामधील एपिसोडमध्ये सामील होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूर सारखे सेलिब्रिटी वेगवेगळ्या टप्प्यात शो होस्ट करणार असल्याची शक्यता आहे.
ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज
सलमान खानचा आगामी चित्रपट
‘बॅटल ऑफ गलवान’ हा नवाकोरा चित्रपट अभिनेता घेऊन येत आहे. तसेच, सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सलमान खानचा रक्ताने माखलेला चेहरा, रुबाबदार मिशी आणि डोळ्यात देशभक्तीच्या ज्वाला बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर प्रकाश टाकत, हे पोस्टर भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर पण गोळ्या न झाडता लढल्या गेलेल्या युद्धाची कहाणी सांगते. १५,००० फूट उंचीवर लडाखच्या गलवान खोऱ्यात घडलेला हा संघर्ष भारताच्या अदम्य साहसाचे प्रतीक ठरला आहे.