(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
तेलुगू चित्रपटसृष्टीतुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावानी यांचे वडील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक शिव शक्ती दत्ता यांचे सोमवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने केवळ कीरावानी यांचे कुटुंबच नाही तर संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी शोककळा पसरली आहे. अनेक दक्षिण भारतीय कलाकारांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.
वयाच्या काही समस्यांमुळे झाले निधन
वृत्तानुसार, संगीतकार एमएम कीरावानी यांचे वडील शिव शक्ती दत्ता हे काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त होते. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद बातमीमुळे संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टी शोकाकुल आहे. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी यांनी शिव शक्ती दत्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि लिहिले की, ‘श्री शिव शक्ती दत्ता एक चित्रकार, संस्कृत भाषेचे अभ्यासक, लेखक, कथाकार आणि बहुप्रतिभावान व्यक्ती होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी माझ्या मित्र कीरावानी गरू आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.’
శ్రీ శివశక్తి దత్తా గారి ఆత్మకు శాంతి చేకూరాలి
ప్రముఖ సంగీత దర్శకులు శ్రీ కీరవాణి గారి తండ్రి, రచయిత, చిత్రకారులు శ్రీ శివశక్తి దత్తా గారు కన్ను మూశారని తెలిసి చింతించాను. శ్రీ దత్తా గారి ఆత్మకు శాంతి చేకూరాలని భగవంతుణ్ణి ప్రార్థిస్తున్నాను. కళలు, సాహిత్యంపై ఎంతో అభిమానం…
— Deputy CMO, Andhra Pradesh (@APDeputyCMO) July 8, 2025
पवन कल्याणसह अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली
तेलुगू चित्रपटसृष्टीपासून ते राजकीय क्षेत्रांपर्यंत शोककळा पसरली. अभिनेता आणि नेते पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आणि लिहिले की, ‘श्री शिवशक्ती दत्ताजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. ते कला आणि साहित्याचे खरे प्रेमी होते. त्यांच्या गाण्यांमध्ये संस्कृत आणि तेलुगूचा अद्भुत मिलाफ दिसून येतो. कीरावनी गारू आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत.’ पवन कल्याण व्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना निरोप दिला. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज
साहित्य आणि संगीताला समर्पित जीवन
शिवशक्ती दत्ता हे केवळ गीतकार नव्हते तर त्यांनी त्यांच्या लेखनातून तेलुगू चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान दिले. त्यांनी ‘बाहुबली’, ‘आरआरआर’, ‘मगधीरा’, ‘राजन्ना’ आणि ‘श्रीरामदासु’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. दत्ताजींनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये पौराणिक कथांची झलक आणि खोली होती. ‘साहोरे बाहुबली’, ‘रामम राघवम’, ‘ममता थल्ली’ आणि ‘अम्मा अवनी’ सारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.