The Family Man Season 3 Teaser Trailer Manoj Bajpayee jaideep ahlawat Nirmit kaur
मनोज वाजपेयी स्टारर बहुप्रतिक्षित ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचा अखेर टीझर रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. अखेर ‘द फॅमिली मॅन ३’ या वेबसीरीजचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. सुमन कुमार आणि तुषार सेथ यांनी या वेबसीरीजचं दिग्दर्शन केलं असून या वेबसीरीजचं कथानक गुप्तहेरावर आधारित असून श्रीकांत पुन्हा एका नवीन आणि धोकादायक मिशनवर जाताना दिसणार आहे. वेबसीरीजच्या थरारक प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधले असून वेबसीरीजबद्दल चाहत्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.
पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मनोज वाजपेयी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्पाय थ्रिलर असणाऱ्या ह्या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांना आणखी एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जयदीपची एन्ट्री चाहत्यांसाठी खास सरप्राईज असणार आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर सुद्धा दिसणार आहे. निम्रत आणि जयदीपच्या रहस्यमय एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राज आणि डीके यांच्या ‘डी2आर फिल्म्स’ने या सिरीजची निर्मिती केली असूव, राज-डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन सुमन कुमार आणि तुषार सेथ यांनी केले आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये प्रेक्षकांना श्रीकांत तिवारी गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसेल. देशाचे रक्षण करण्यासोबतच श्रीकांत एक चांगला वडील आणि पती म्हणून देखील तो आपली भूमिका अगदी लिलया पार पाडताना दिसतो. एका मध्यमवर्गीय माणसाला ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्या संकटांशी लढताना तो देशासाठी लढा देत असल्याचे दाखवण्यात आले. ‘द फॅमिली मॅन ३’ या वेबसीरीजमध्ये श्रीकांत एका नवीन आणि धोकादायक मिशनवर जाताना आपल्याला दिसणार आहे. देशाच्या सीमेवर आत आणि बाहेरून निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत नवीन वाटांवर प्रवास करताना चाहत्यांना श्रीकांत दिसणार आहे.
घटस्फोटाचे दुःख, पराग त्यागीच्या चांगुलपणा आणि काळजीने सावरले; शेफालीने केला होता खुलासा
आजवर प्रेक्षकांच्या भेटीला वेबसीरीजचा पोस्टर आणि प्रोमो आलेला आहे, परंतु प्रेक्षकांच्या समोर अद्याप तरीही रिलीज डेट आलेली नाही. चाहत्यांना ‘द फॅमिली मॅन ३’ या वेबसीरीजच्या रिलीज डेटची आतुरता आहे. या वेबसीरीजमध्ये पुन्हा एकदा मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत तर, प्रियमणी (सुचित्रा तिवारी), शारिब हाशमी (जेके तलपडे), आश्लेशा ठाकूर (धृति तिवारी) आणि वेदांत सिना (अथर्व तिवारी) यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना पुन्हा दिसणार आहेत. समांथा रुथ प्रभू, जयदीप अहलावत आणि निम्रत कौर देखील वेबसीरीजमध्ये दिसणार आहेत. अद्याप जयदीप आणि निम्रत कोणत्या भूमिकेत दिसणार ही माहिती तरीही गुलदस्त्यातच आहे. येत्या काही दिवसातच ही सीरिज ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.