हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट फायटर (Fighter) २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पंसती मिळाली. मोठ्या पडद्यावर चाहत्याचं भरभरून प्रेम मिळल्यानंतर आता ‘मल्टिस्टारर’ चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क आणि ओटीटीच्या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफार्मला विकण्यात आले आह, अशी माहिती समोर येत आहे
[read_also content=”‘रसोड़े में कौन था’ फेम यशराज मुखाटे अडकला विवाहबंधनात, साध्या पद्धतीनं गर्लफ्रेंडसोबत केलं रजिस्टर मॅरेज! https://www.navarashtra.com/movies/yashraj-mukhate-tie-a-knot-with-his-girlfriend-nrps-511753.html”]
2019 मध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित हा चित्रपट होळीच्या निमित्ताने मार्च महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु 21 मार्च 2024 पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल अशी चर्चा आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाची कथा ही हवाई दलाच्या धाडसी मोहिमेवर आधारीत आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च 250 कोटींच्या घरात होता. या चित्रपटाने एकूण 336 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क आणि ओटीटीचे हक्कांची मोठी डील करण्यात आली आहे.फायटरनं आतापर्यंत बॅाक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवसला. चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन आता 350.66 कोटी असून भारतात 250.16 कोटी कमावले आहेत.