सुनिता आहुजाने सुरू केला ब्लॉग, झाली ट्रोल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शहरात येणारी ही नवीन व्लॉगर कोण आहे ते ओळखा पाहू? सुनीता आहुजा. गेल्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणामुळे गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा चर्चेत आहे आणि आता युट्यूबवर नवा ब्लॉगही तिने सुरू केला आहे. हो. गोविंदाची पत्नी आता व्लॉगर झाली आहे. गुरुवारी तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या पहिल्या यूट्यूब व्हिडिओचा टीझर शेअर केला. त्याची सुरुवात सुनीता यांच्या धमाकेदार एंट्रीने होते ज्यात बॅकग्राउंडमध्ये ‘बीवी नंबर १’ हे गाणे वाजत आहे.
त्यानंतर सुनीता आहुजा तिच्या यूट्यूब प्रवासाची सुरुवात जाहीर करत आहे आणि ती म्हणते, “नमस्कार मित्रांनो, मी सुनीता आहे. तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनेलवर पाहत आहात. सबने पैसे कामाये, अब मेरी बारी है. अब मैं कमाऊंगी, छापूंगी” त्यानंतर ती तिचे सोन्याचे दागिने दाखवते.
टीझरमध्ये दिसून येते आहे की सुनीता तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य करणार आहे. ती म्हणते, “हे एक वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. मला माहीत नाही की किती लोकांनी माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या आणि बकवास बोलले आहेत” या ब्लॉगमध्ये तिने चंदीगडमधील काही मंदिरांना भेट दिल्याचे दिसून येत आहे.
जंगलासारख्या परिसरात असलेल्या महाकाली मंदिराला भेट दिल्यानंतर, ती तिच्या पुढच्या थांब्यासाठी, कालभैरव बाबा मंदिरासाठी काही बाटल्या खरेदी करण्यासाठी एका दारूच्या दुकानातदेखील गेल्याचे दिसून येत आहे. टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनीता थांबली आणि दोन बाटल्या खरेदी केल्यावर तिने स्पष्ट केले, “या बाटल्या माझ्यासाठी नाहीत, तर बाबांसाठी होत्या. मी या स्वतःसाठी खरेदी करत आहे असे समजू नका. या दुसऱ्या मंदिरासाठी आहेत आणि मी त्या तिथे प्रार्थना म्हणून त्या अर्पण करेन. सर्वांना वाटेल कदाचित मी बेवडी आहे, ते कदाचित विचार करत असतील की मी पीत आहे, पण हे माझ्यासाठी नाही, ते देवासाठी आहे.” असेही तिने सांगितले आहे.
तिने आपल्या दर्शकांना मंदिर दाखवले आणि मंदिरात दारू अर्पण केली. मग तिने पुजारी आणि त्याच्या मुलाला विचारले की मंदिरात दारू का अर्पण केली जाते, ज्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘कारण बाबा ते पितात आणि सर्व दुष्ट राक्षसांचा नाश करतात.’
व्हिडिओमध्ये सुनीता आहुजा बाईक चालवताना, मंदिरात जाऊन इतरांसोबत मजा करतानाही दिसते. व्हिडिओमध्ये तिचा मदतनीस महेशची ओळख करून दिली आहे, जो सुनीतासोबत सर्वत्र दिसतो. व्हिडिओमध्ये सुनीता दारू खरेदी करतानाही दिसते. ती म्हणते, ‘मी स्वतःसाठी दारू खरेदी करत आहे असे समजू नको. सर्वांना वाटेल की आम्हीही दारुडे आहोत.’
टीझर शेअर होताच, नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि सुनिताला ट्रोलही केले आहे आणि गोविंदाच्या पत्नीवर फराह खान आणि तिचा स्वयंपाकी दिलीपची कॉपी केल्याचा आरोप केला. एका युजरने लिहिले- ती फराह खानची स्वस्त कॉपी बनण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याने लिहिले- कॉपी करू नको. त्यामुळे आता सुनीताचे हे ब्लॉग कसे असतील आणि कशा पद्धतीने ती वेगळे काम करू शकते हे तिच्या चाहत्यांना नक्कीच पहायचे आहे.