पंजाबी गायक गुरु रंधावाने लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केलीये. त्याची गाणी चाहते मोठ्या उत्साहाने ऐकतात. यामुळेच तो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. गुरु रंधावा हा गायक, संगीतकार म्हणून ओळखला जातो. त्याचवेळी पुन्हा एकदा सिंगर आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन आणि थोडा वेगळा अल्बम घेऊन येत आहे. ज्याचा टीझर ८ ऑगस्टला रिलीज झालायं. ज्यामध्ये जागेची झलक पाहायला मिळाली. हे पाहिल्यानंतर चाहते या संपूर्ण अल्बमची आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्याचवेळी गुरू रंधावाने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेऊन आज या अल्बममधील त्याचा फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज केलायं. त्याचा हा लूक खरोखरच खूप चांगला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये गुरु रंधावा अंतराळवीराच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
गायक गुरु रंधावाने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचा फर्स्ट लुक शेअर केलायं. हे गाणं २२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारे. त्याच्या या लूककडे चाहते झपाट्याने आकर्षित होत आहेत. हे संपूर्ण गाणं भूषण कुमारच्या टी-सीरीजवर २२ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणारे.