वेटर ते बॉलिवूड अॅक्टर; 'असा' होता बोमन इराणी यांचा फिल्मी प्रवास...
‘मुन्नाभाई’, ‘थ्री इडियटस्’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ अशा दर्जेदार चित्रपटांतून दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बोमन इराणी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. बोमन यांना आज प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ना कोणता गॉडफादर ना कोणता परिवातला सदस्य फिल्म इंडस्ट्रीत… तरीही त्यांनी स्वतःच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावले. एकेकाळी ताज हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारे, एकेकाळी फोटोग्राफरचं स्वप्न पाहणाऱ्या बोमन इराणी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा प्रवास जाणून घेऊया…
रेश्मा शिंदेच्या लग्नातले Unseen Photos आले समोर
फिल्मी करियरमध्ये विनोदी, गंभीर, नायक आणि खलनायक अशा सर्वच भूमिका अभिनेते बोमन इराणी यांनी अगदी लिलया साकारल्या आहेत. बोमन यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी एका सामान्य पारसी कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच घरातल्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी फार कमी वयात काम करायला सुरूवात केली होती. परिस्थितीने काही प्रमाणात गरीबीची चटके दिल्याने बोमन इराणी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले होते. पण त्यांना मोठे होऊन फोटोग्राफर व्हायचं होतं. आजही बोमन एक उत्कृष्ट अभिनेता असून ते एक उत्कृष्ट फोटोग्राफरही आहेत.
घरातील परिस्थिती हालाकीची असल्यामुळे बोमन यांच्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली होती. त्यामुळे बोमन यांच्यावर ताज हॉटेलमध्ये काम करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यांनी ताज हॉटेलमध्ये २ वर्षे काम केलं, त्यांनी तिथे वेटर आणि सर्व्हिस स्टाफचं काम केलं. हे काम करत असताना त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. त्यांना एकदा प्रसिद्ध कॉरिओग्राफर शामक डावर भेटले होते. त्यांनीच बोमन यांना थिएटर जॉईंट करण्याचा सल्ला दिला होता. आणि तिथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला सुरुवात झाली.
सलमान आणि शाहरूख जे नाही करू शकला ते अल्लू अर्जूनने करून दाखवलं, ‘पुष्पा २ द रूल’ची देशभरात चर्चा
बोमन यांचं नशीब २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटापासून खऱ्या अर्थाने बदललं. त्या चित्रपटातील त्यांच्या डॉ. अस्थाना या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाले. त्यांच्या डॉ. अस्थानाच्या भूमिकेत त्यांना चांगलीच पसंती मिळाली. यानंतर त्यांनी ‘लक्ष्य’, ‘वीर-जारा’, ‘पेज-३’, ‘नो एण्ट्री’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली. ‘३ इडियट्स’ मध्ये बोमन इराणी यांनी व्हायरसची भूमिका इतकी छान केली की ते चित्रपटातील मुख्य कलाकारांवर देखील भारी पडले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.