मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. सुनीलवर मुंबईत हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. पुण्यात एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान तो आजारी पडला आणि आता त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे.
अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकांना नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. मात्र, याचवेळी त्याच्याशी संबंधित एक गंभीर बातमी समोर आली आहे. त्यामुळे फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता त्याची प्रकृती ठीक असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. अभिनेत्याची ही बातमी ऐकून त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
[read_also content=”गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल ‘मी वसंतराव’ १ एप्रिलला होणार प्रदर्शित https://www.navarashtra.com/latest-news/marathi-cinema/on-the-auspicious-occasion-of-gudipadva-me-vasantrao-movie-will-be-release-on-1-april-nrps-231476.html”]
अभिनेता सुनील ग्रोवर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉक्टर मशूर गुलाटीची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. लोकांनी डॉक्टर मशूर गुलाटीच्या भूमिका पंसतीस उतरली. त्याचबरोबर प्रेक्षकही त्याला भरभरून प्रेम देतात. रिंकू भाभी आणि डॉ. मशुहर गुलाटी यांच्या नावांशी परिचित नसलेले कॉमेडी टीव्ही शो, गुत्थी आवडणारे क्वचितच कोणी असतील. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची ओळख म्हणजे हे पात्र. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मधील या व्यक्तिरेखेने त्यांना रातोरात लोकप्रियता मिळवून दिली. सुनील ग्रोव्हर त्याच्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर मांजरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मांजर डोळ्यात काळे सनग्लास लावून, मांजरीच्या गळ्यात सोन्याची साखळी घालून गंमतीने गाणे ऐकताना दिसत आहे.
[read_also content=”‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम मल्याळम अभिनेत्री करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/the-great-indian-kitchen-fame-malayalam-actress-will-make-her-marathi-film-debut-nrps-231543.html”]