सोनी बीबीसी अर्थ या भारतीय प्रेक्षकांसाठी विचारशील कंटेन्ट व प्रेरणादायी उपक्रम सादर करण्यामध्ये नेहमीच पुढे असलेल्या चॅनेलला या महिन्यासाठी ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून शान ललवानीची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या सन्मानामधून शान हिचे पूर्णत: बायोडिग्रेडेबल असलेल्या क्लीनिंग डिटर्जंट फॉर्म्युलासाठी पर्यावरणीय संवर्धन आणि स्थिरतेप्रती योगदान दिसून येत आहे.
शान ललवानीचा प्रवास वैयक्तिक प्रबोधनासह सुरू झाला. प्रवासादरम्यान शानला सागरी जीवनावर केमिकल प्रदूषणाचे घातक परिणाम दिसून आले. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या क्लीनिंग एजंट्समध्ये केमिकल्स असतात, जे जलीय संस्था प्रदूषित करतात. म्हणून, शानने पर्यावरणास अनुकूल पर्याय सादर केले आहेत आणि कोको कस्टोची स्थापना केली आहे. ही कंपनी नॉन-टॉक्झिक आणि बायोडिग्रेडेबल लॉंड्री डिटर्जंट्सचे उत्पादन करते.
सोनी बीबीसी अर्थच्या ‘अर्थ चॅम्पियन्स’ उपक्रमाचा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात शाश्वतता आणण्याप्रती योगदान देणाऱ्या शान सारख्या व्यक्तींना प्रशांसित करण्याचा, तसेच पर्यावरणामध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे. मासिक प्रॉपर्टी लक्षवेधक स्कोअरसह शॉर्ट-फॉर्म कंटेन्ट म्हणून अर्थ चॅम्पियनने केलेल्या कामगिरीला दाखवते. हे सगळे व्हिडिओ चॅनेलवर प्रसारित केला जातात आणि ऑनलाइन माध्यमाच्या माध्यमातून प्रचार केला जातो.
शान ललवानी बद्दल बोलताना सोनी बीबीसी अर्थच्या संस्थापक म्हणाल्या, ”ब्रँड म्हणून आम्ही प्रेक्षकांसाठी आवड सादर करणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या आणि शाश्वत पद्धतींना चालना देणाऱ्या कथा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा अर्थ चॅम्पियन्स उपक्रम या कटिबद्धतेचे परिपूर्ण प्रतीक आहे. आम्हाला शान ललवानीची आमची नवीन अर्थ चॅम्पियन म्हणून घोषणा करताना आनंद होत आहे. तिच्या प्रवासामधून दिसून येते की, लहान प्रयत्नांमधून व्यक्तींना पर्यावरणाप्रती जागरूक जीवन जगण्यास आणि इतरांना त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी प्रेरित करण्यास मदत होऊ शकते.”
हे देखील वाचा- जागतिक संगीत दिनानिमित्त सोनी पिक्सवर पहा सोनी बीबीसी अर्थ आणि हन्स झिमर स्पेशल शो
तसेच, या यशाबद्दल बोलताना शान ललवानी म्हणाली, ”सोनी बीबीसी अर्थचा अर्थ चॅम्पियन किताब मिळाल्याने सन्माननीय वाटत आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेलने मला माझी कथा अनेक लोकांपर्येंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला आहे. मी आशा करते की, हा प्लॅटफॉर्म त्यांना ते उचलणाऱ्या प्रत्येक पावलादरम्यान प्रेरित करेल. माझा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये पर्यावरण संवर्धनाप्रती सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याची क्षमता आहे.” असं ती म्हणाली.