Housefull 5 Day 1 Box Office Collection
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तगडी स्टारकास्ट असलेला ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपट ६ जून रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. बॉलिवूडमधली सगळी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाचे प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक केले जात असून दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे.
दीपिकावर झाली १४ तास शस्त्रक्रिया, पती शोएबने दिली हेल्थ अपडेट; म्हणाला, “लिव्हरचा भाग कापून…”
पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘हाऊसफुल्ल ५’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्क ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, २४० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या ‘हाऊसफुल ५’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटासाठी ही एक चांगली सुरुवात आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता चित्रपटाच्या कमाईमध्ये पहिल्या विकेंडला उत्तम कमाई करण्याची शक्यता आहे.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात अनेक उत्तम कलाकार आहेत. चित्रपटाला समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षक मात्र हा मजेदार चित्रपट असल्याचं म्हणत आहेत. कॉमेडी-थ्रिलर चित्रपट एकूणच प्रेक्षकांना भावल्याचं दिसत आहे. ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बजावा, नरगिस फाकरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रगंदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.