(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. ‘दशावतार’ची बॉक्स ऑफिस वरील कमाई दिवसेंदिसव वाढतच आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपाने प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी तब्बल २.६५ कोटींची कमाई केली आहे. एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई आहे. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९.२ कोटींची कमाई केली होती. शनिवारच्या शेवटच्या कलेक्शननंतर, चित्रपटाचे एकूण कलेक्शन १२.८५ कोटी रूपये झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २० सप्टेंबर रोजी दशावतार ने थिएटरमध्ये एकूण ६१.४९ टक्के गर्दी नोंदवली आहे. अनेक भागात दशावतार चित्रपटाचे शो उपलब्ध नसल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचे शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.” प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये शो वाढवण्यात आले आहेत” अशी पोस्ट निर्मात्यांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयात धाव, केले मदतीचे आवाहन
दशावतार या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात चित्रपटात दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्रीची मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांची व्यक्तिरेखा कोकणातील एका समर्पित दशावतारी लोकनाट्यातील कलाकाराची आहे. तर सिद्धार्थ मेनन याने या सिनेमात बाबुली मेस्त्रीच्या मुलाची माधव मेस्त्रीची भूमिका साकारत आहे.
याशिवाय या सिनेमात महेश मांजरेकर, भरत जाधव, सुनीत तावडे, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, रवी काळे, आरती वडगबाळकर आणि प्रियदर्शनी इंदलकर तसेच कोकणातले काही स्थानिक कलाकार यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
२०२५ मध्ये अशी कामगिरी करणारा ‘दशावतार’ हा पहिलाच सिनेमा आहे. यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात यश कोणत्याच सिनेमाला मिळालं नव्हतं.