बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर () सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या व्यवसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जान्हवी तिच्या नवीन चित्रपट ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्याना एका मुलाखतीदरम्यान तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 13 वर्षी तिचे काही फोटो अश्लील साईट्सवर व्हायरल झाले होते, असं जान्हवीने सांगितले आहे.
जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताचं त्याचा ट्रेलर लॅान्च करण्यात आला. या ट्रेलरला फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही पंसती दर्शवली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखती दरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही धक्कादायक बाबी सांगितल्या.
काय म्हणाली जान्हवी
जान्हवीने करण जोहरसोबत बोलताना सांगितल की, “मी वयाच्या 12-13 व्या वर्षी आई-बाबांसोबत एका इव्हेंटला गेले होते. त्यावेळी इंस्टाग्राम सुरू झालं होतं. दरम्यान मी इंस्टावर शेअर केलेले फोटो एका अश्लील साईटवर लीक झाले. तेव्हा शाळेतील मुलंही माझ्यावर हसत होते”.
पुढे बोलताना जान्हवी म्हणाली की, मला एका ठराविक पद्धतीचे कपडे घालायला आवडतात. माझा जन्मही सिनेसृष्टीशी संबंधित घरात झाला आहे. त्यामुळे मी काय कपडे परिधान करायचे यावर कोणाचं बंधन नसतं. मला कोणी जर्ज करत नाही. कंफर्टेबल कपडे घालण्यावर माझा भर असतो”.
Web Title: Janhvi kapoor shocking statement her photo was leaked on adult site nrps