जान्हवी कपूरचा रिअल फ्लोरल साडी लुक झाला व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत आणि यावेळी जान्हवीने नेहमीपेक्षा वेगळी फॅशन स्टाईल कॅरी केली आहे. तिचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. तिला या फोटोशूटसाठी अनेक कमेंट्स मिळत आहेत. पण नक्की हा लुक कसा आहे ते आपण या लेखातून डिकोड करूया.
जान्हवीचा फॅशन सेन्स हा अत्यंत अप्रतिम असून ती कोणत्याही पद्धतीचा लुक नेहमीच अप्रतिमरित्या कॅरी करताना दिसते. जान्हवीने यावेळी नेहमीपेक्षा वेगळीच सहावारी साडी नेसली असून ही साडी खास फुलांनी तयार करण्यात आली होती. तिच्या या साडीचा लुक कमाल वाटत असून जान्हवी या लुकमध्ये अधिक आकर्षक दिसत आहे, पहा तिचा हा व्हायरल लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
जान्हवी आणि सिद्धार्थचा नवा चित्रपट
परम सुंदरी जान्हवी
सध्या जान्हवी आणि सिद्धार्थ आपल्या नव्या ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र यावेळी जान्हवीने तिच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य मुलीची भूमिका जान्हवी करत आहे आणि तिचा हा लुक त्याहीपेक्षा अधिक आकर्षक आणि लक्षवेधी ठरलेला दिसून येत आहे. जान्हवीच्या या नव्या लुकने इंटरनेटला आग लावली आहे.
जणू श्रीदेवीच, दाक्षिणात्य लुकमध्ये जान्हवी कपूरचे निखळ सौंदर्य
फ्लोरल साडी
जान्हवीचे फ्लोरल साडी डिझाईन
जान्हवीने यावेळी गुलाबी शेड असणारी मात्र खऱ्या फुलांची एम्ब्रोयडरी करण्यात आलेली साडी नेसली आहे. तिच्या या फॅशनने सर्वच मंत्रमुग्ध झाले असून तिच्या या लुकवरून आणि चेहऱ्यावरून चाहत्यांची नजरच हटत नाहीये. जान्हवीचा हा लुक कमालीचा कातिलाना आणि फॅशनेबल असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. तिच्या या लुकवर अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव होतोय.
फेमिनाईन डिझाईन
जान्हवीच्या साडीचा जाळीदार लुक
जान्हवीच्या साडीसह तिच्या ब्लाऊजवरदेखील सुंदर भरतकाम करण्यात आले असून तिचा हा ब्लाऊज फुलांसह अत्यंत क्लासी पद्धतीने शिवण्यात आला आहे. तिच्या नावाप्रमाणेच ती सुंदर दिसावी याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला असून तिची ही फॅशन कुठेही कमी पडलेली नाही.
मिनिमल ज्वेलरी
जान्हवीने केळव मोत्याचे कानातले घातले आहेत
जान्हवीने या साडीचा लुक पूर्ण दिसावा यासाठी अत्यंत मिनिमल ज्वेलरी घातली आहे. तिने कानात मोत्याचे लहानसे टॉप्स घातले असून गळ्यात आणि हातात कोणतेही दागिने घातलेले नाहीत. त्यामुळे साडीवरील नजर अन्य कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. जान्हवीचा हा लुक तुम्ही एखाद्या हळदीच्या कार्यक्रमासाठी वा घरातील लग्नासाठी नक्कीच कॅरी करू शकता
Janhvi Kapoor Birthday: ‘सुंदरा सुंदरा…’ जान्हवी कपूरचे स्टायलिश लुक करून दिसाल अधिक आकर्षक
मोकळे केस आणि न्यूड मेकअप
जान्हवीची क्लासी हेअरस्टाईल
जान्हवीने या साडीसह केस मोकळे सोडले आहेत आणि केवळ केसांना मधून भांग पाडल आहे. तिचा हा लुक अधिक सुंदर दिसून येत आहे आणि यासह तिने न्यूड मेकअप केलाय. फाऊंडेशन, प्रायमर, हायलायटर, काजळ, आयलायनर, मस्कारा, आयलॅशेस आणि ग्लॉसी पिंक न्यूड शेड लिपस्टिक लावत तिने तिचा लुक पूर्ण केलाय