फोटो सौजन्य: कंगना रणौत इन्स्टाग्राम
अभिनेत्री कंगना रणौत एक चांगली अभिनेत्री आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ती एक उत्तम दिग्दर्शक आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने राजकारणातही एन्ट्री घेतली. सध्या अभिनेत्री हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा क्षेत्राची खासदारही आहे. यासोबतच अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वी स्वत:चे हॉटेल सुरु केले होता. १४ फेब्रुवारीपासून कंगनाने मनालीमध्ये स्वत:चे हॉटेल सुरु केले. वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमवणाऱ्या कंगनाने एक चूक केली आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे.
Bollywood actress Kangana Ranaut said she forgot dance after MP work and being restaurant owner”#KanganaRanaut #Bollywood#Kollywoodpic.twitter.com/K4cuZfXZOz
— Ajay kumar (@Ajaykum36701922) February 17, 2025
रायगडावर शंभू राजांच्या चरणी ‘छावा’ झाला नतमस्तक, म्हणाला, ‘आयुष्यात पहिल्यांदाच…’
अलीकडेच कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती एका डान्स कोरिओग्राफरसोबत डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनाने सांगितले की, काही महिन्यांच्या ब्रेकमुळे तिचे अनेक वर्षांपासून घेत असलेली डान्स ट्रेनिंग कशापद्धतीने कमजोर झाली आहे. व्हिडिओमध्ये, कंगना एका डान्स कोरिओग्राफरसोबत डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. तिने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर, निवडणूक लढवल्यानंतर आणि कॅफे उघडल्यानंतर, माझं डोकं आता असंच होणार आहे, नृत्य म्हणजे काय, मी कुठे आहे, मी कोण आहे… मी माझा पाय डावीकडे ठेवावा की उजवीकडे?”
‘देसी गर्ल’चा हळवा अंदाज, गरजूला केली मदत; प्रियंकावर होतोय कौतुकाचा वर्षाव
आणखी एक व्हिडिओ तिने शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांना वाटते की, मला सर्वकाही नैसर्गिकरित्या येते. पहा, काहीही नैसर्गिकरित्या येत नाही. वर्षानुवर्षे केलेली डान्स प्रॅक्टिस आणि कौशल्य काही महिन्यांतच नाहीसे झाले कारण मी नेहमी सराव करत नव्हते.” कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वी तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले होते. आता कंगनाने आर माधवनसोबत तिच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. माधवन आणि कंगना १० वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.