पहिल्या दिवशी दि. 29 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धेची सुरुवात होईल. या दिवशी इन सर्च ऑफ (अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती, सांगली), आभाळाएवढी माया (सौ. मीनलताई शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी), प्लॅटफॉर्म (आजरा महाविद्यालय आजरा), पेंडुलम (कलासक्त मुंबई), कुणासाठी ? कशासाठी ? (चंदगडी कलाकार, चंदगड), तळ्यात मळ्यात (क्रिएटिव्ह कार्टी मुंबई), अशी ही दुनियादारी (थिएटर वर्कशॉप सातारा), खानदानी (पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा), म्हवं उठलाय (कारवा थिएटर, कोल्हापूर) एकांकिका सादर होतील.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि. 30 रोजी फुलपाखरू (थिएटर मुव्हमेंट सातारा), वारी जावा (निर्मिती नाट्य संस्था, सातारा), अस्तित्व (संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), कौल (आनंदरंग कलामंच, सोलापूर), नथिंग टू से (चौंडेश्वरी कलापरिवार, इचलकरंजी), बोहाडा (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे), काहीतरी अडकलंय (नाट्य आरंभ व मैगो एंटरटेनमेंट, पुणे), कॅलिडोरकोप (मधुमिलिंद रत्नागिरी), ग्वाही (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर), उन्नीस सौ नब्बै (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर) या एकांकिका होणार आहेत.
बुधवारी 31 डिसेंबर रोजी मॅजिक मोमेंट (तुमचं आमचं, मुंबई), चिड्डी (रंगाविष्कार, ईश्वरपूर), होळी झाली (शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर), गुड फॉर नथिग (अमित देशमुख क्रिएशन, सातारा), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था, जयसिंगपूर), ओल्या भिती नियारा प्रयोगशाळा नियारा फाउंडेशन कोल्हापूर, काळ्या बंबाळ अंधारी (नाट्य शुभांगी, जयसिंगपूर), धरधर (प्रयोग कोल्हापूर), यात्रा (वननेस प्रोडक्शन ठाणे), पाकळ्या (नक्षत्र कला मंच मुंबई) या एकांकिकांचे सादरीकरण होईल.
समारोपाच्या दिवशी गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी घबाड (डीकेएएससी कॉलेज, इचलकरंजी), प्रेम की यातना (वैभवदीप नाट्यसंस्था, सोलापूर), जेन-एक्स (हेरंब थिएटर्स सातारा), साठा उत्तराची कहाणी (नक्षत्र थिएटर्स सोलापूर), फिल्टर नसलेलं वास्तव (नाट्यकला अकादमी सातारा), हॉल तिकीट (वीणा स्टुडिओ कोल्हापूर), पाऊस पाड्या (लोकमान्य टिळक वाचनालय, बामणोली सांगली), नकाब (शब्दज, कोल्हापूर) आणि कुपन (रंगयात्रा, इचलकरंजी) या एकांकिका सादर होतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याचवेळी सर्व सादरीकरण संपल्यानंतर होईल. सदरच्या मनोरंजन करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागातील नाट्य कलाकारांचा उत्स्फूर्त नाट्यविष्कार पाहण्याची संधी इचलकरंजी शहर तसेच परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.
Ans: ही स्पर्धा इचलकरंजी येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.
Ans: ही स्पर्धा मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
Ans: कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आदी भागांतील संघ सहभागी झाले आहेत.






