• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Lata Mangeshkar Award Announced To Anuradha Paudwal

अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर; अनेक कलावंतांना केले पुरस्कारित

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर अनेक कलावंतांना महाराष्ट्र सांस्कृतिक पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 13, 2024 | 05:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे सास्कृति कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ची ही घोषणा करण्यात आली आहे.

लोककला क्षेत्राचा पुरस्कार

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४ चा नाटक विभागासाठीचा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे, नृत्य वर्गवारीत सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजय नाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे, तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत, तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रूपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते, तर आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लक्ष रोख, मानपत्र व मानचिन्ह असे झाले आहे.

मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून या पुढील काळातील सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यातही कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिकाधिक संपन्न व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सदैव तत्पर असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच हे सर्व पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Lata mangeshkar award announced to anuradha paudwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Lata Mangeshkar

संबंधित बातम्या

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!
1

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप
2

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील
3

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक
4

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.