Marathi Actor Manmohan Mahimkar Talks About His Life Struggle
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, की ज्यांच्याकडे उतारवयात काम नाहीत. त्यांना त्यांच्या उतारवयातही बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्यावर सुद्धा अशीच काहीशी वेळ आली आहे. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडली आहे. उतारवयात त्यांच्याकडे हातात काम नाही. हातात काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर उरलेलं आयुष्य कशापद्धतीने जगायचं ? असा प्रश्न पडला आहे. नुकतंच मनमोहन माहिमकर यांनी एका मराठी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल हा खुलासा केला आहे.
‘Sitare Zameen Par’ चित्रपटाला मिळाला हिरवा सिग्नल, सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कटशिवाय दिली मंजुरी
मुलाखतीदरम्यान मनमोहन माहिमकर म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या हातात काम नसल्यामुळे मी पोरका झालोय. त्यात मला कोणीही नाहीये, मी माझ्या घरी एकटाच असतो. आमची जुनी बिल्डिंग होती, ती आता डेव्हलपमेंटला गेली आहे. पहिले दोन- तीन वर्षे बिल्डरने आम्हाला भाडं दिलं, पण आता तो पण ते देत नाही. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी रोज वरण- भात खातो, नाहीतर कधीतरी बाहेरुन चपात्या आणतो आणि तर कधी बाहेरुन भाजी आणून खातो. माझ्याकडे मटन खाण्यासाठीही पैसे नाहीत. मी माझ्या इच्छा मारतो. पैसे नसल्यामुळे मी काही तरी साधंच जेवतो. कधी दही भात, कधी लोणचं भात खाऊन जगतो. असे मी सध्या दिवस जगतोय.”
मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हार्ट अटॅक; डॉक्टरांना म्हणाला, “मी प्रयोग करून येतो, नंतर…”
मुलाखतीदरम्यान मनमोहन माहिमकर यांनी पुढे सांगितलं की, “कोणी आता राहिलं नाहीये, या वयामध्ये माझ्यासोबत. वय जास्त झाल्यामुळे माझ्याकडे कोणी आता बघायलाही तयार नाहीये. माझा मोठा भाऊ आहे. तो ६९ मध्ये लग्न करून निघून गेला होता. त्यानंतर ५०-५५ वर्षांमध्ये कधी माझ्याकडे आलेलाच नाहीये आणि रेशनकार्ड वगैरे सगळं घेऊन गेलाय. आता त्याला माहित पडलं आमच्याकडे डेव्हलपमेंट होतेय तर माझ्याकडे आला आणि मला जागा विकायला लावतोय. मला बोलतो तू एकतर आश्रमात जा आणि तिकडे राह जागेची वाटणी कर एवढं असताना मी त्याला सांगितलंय का मी मेल्यावरती तुला जागा मिळणारच आहे. तो काय म्हणतो मी काय तुझ्या मरणाची वाट पाहू का? त्याच्या बायकोकडे गेला. ”
मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनावर प्रियांकाची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘ते नेहमीच आमच्या हृदयात…’
“दोघं एकत्र येऊन त्यांनी मला दोघांनी कोर्टात घेतलं पुरावे नसताना. आता माझं जीवन जगणं खूप कठीण होत चाललेलं आहे. मला वहिनीने सांगितलंय तू जर ही जागा विकून आम्हाला पैसे नाही दिले तर मी बाईमाणूस आहे. मी तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन आणि जागा मिळवून दाखवेन,” असे मनमोहन माहिमकर मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाले.