मनोरंजन क्षेत्राला मोठी मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठीचे वयाच्या 38व्या वर्षी कर्करोग म्हणून निधन झाले आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये आता शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे अचानक निधन झाल्यामुळे सर्वानाच धक्का बसला होता त्यानंतर आता प्रिया मराठे हिच्या निधनाने देखील आता सर्वानाच धक्का बसला आहे. अभिनेत्री मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी लढत होती, मात्र आज सकाळी 31 ऑगस्ट रोजी तिचे अखेरचा श्वास घेतला आहे.
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट? सदस्यांनी केलं कोमलला टार्गेट
प्रिया मराठे हिने हिंदी मालिकांमध्ये त्याचबरोबर मराठी मालिकामध्ये देखील कमालीचे काम केले आहे. तिला तिच्या पवित्र्य रिश्ता या मालिकेमधून प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचबरोबर तिने यासह चार दिवस सासुचे, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी यासारख्या लोकप्रिय मालिकेमध्ये तिने नाव कमावले आहे. तिने तिची छाप हि तिच्या अनिनयाने पाडली आहे. मालिका क्षेत्रातून प्रियाने मोठं नाव कमावलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कानावर येताच मराठी त्याचबरोबर हिंदी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे हिच्या निधनामुळे सर्वानाच धक्का बसला आहे. 23 एप्रिल 1987 रोजी प्रिया मराठे ही चा जन्म महाराष्ट्रामधील ठाण्यात झाला होता. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमीवर तिचे बालपण घडले कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती आणि तिथूनच तिच्या अभिनयाला सुरुवात झाली. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्रीला बॅटमिंटन, ट्रॅव्हल आणि वाचनाची आवडत होती.
ती आध्यात्मिकतेतही आस्था ठेवायची आणि मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये तिने मालिकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. प्रिया मराठे हिने तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रिया मराठे हिचे लग्न २०१२ मध्ये शंतनू मोघे या अभिनेत्यासोबत झाले होते.