(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम नायिका अमृता खानविलकर पुन्हा एकदा एका विशेष बातमीमुळे चर्चेत आली आहे. आजवर तिने डान्स, चित्रपटातील विविध भूमिका,नच बलिये सारखे अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अभिनेत्री तब्बल वीस वर्षानंतर रंगभूमीवर परतणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवल्यानंतर ही मराठी अभिनेत्री रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे.
लवकरच ती ’लग्न पंचमी’ या आगामी नाटकामध्ये तब्बल वीस वर्षानंतर मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे. या नाटकाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी निपुण धर्माधिकारी यांनी सांभाळले आहे.काही दिवसांपूर्वीच अमृता ने आणि संपूर्ण टीमने या नाटकाची घोषणा केली होती. मात्र अमृतासोबत आणखी कोण असेल याची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर भूमिका साकारणारा अभिनेता दिसत आहे.हा व्हिडिओ शेअर करत तिने मी माझ्या पार्टनरचे स्वागत करत आहे असे कॅप्शन मध्ये लिहिले आहे.
या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत दुसरे- तिसरे कोणी नसून अभिनेता स्वप्नील जोशी आहे. स्वप्नील जोशी अमृताबरोबर लग्न पंचमी या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. अमृताच्या या व्हिडिओवर प्रसाद ओक आणि अभिषेक राहाळकर यांनी कमेंट करून स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीदेखील कमेंट करत अमृता आणि स्वप्नीलला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ‘जिवलगा’ मालिकेतील ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
स्वप्नील जोशीने याआधी ‘गेट वेल सून’ या नाटकात काम केले होते. आता तो पुन्हा एकदा रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.तर अमृता आणि स्वप्नील जोशीने यांनी वेलकम जिंदगी यात एकत्र काम केले आहे. आता लग्न पंचमी या नाटकातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.






