(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर एकमेकांना डेट करत आहेत या चर्चेला उधाण आले आहे. अनेकदा हे दोघेही कार्यक्रमात आणि इव्हेंट्सदरम्यान स्पॉट झालेले दिसले आहेत. या दोघांची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. आता याचदरम्यान अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रेखा यांना भूषण प्रधान सोबत भेट करून देत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. या तिघांना एकत्र व्हिडीओमध्ये चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अनुषाने रेखासोबत करून दिली भूषणची भेट
बॉलीवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीनिमित्त एक भव्य पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये बॉलिवूडच्या सर्व सौंदर्यवतींनी हजेरी लावली. ज्यामध्ये मराठी अभिनेत्री अनुषा दांडेकर आणि मराठी अभिनेता भूषण प्रधान देखील सहभागी होताना दिसले. याचदरम्यान या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रेखाजी अभिनेत्री अनुषाला मिठी मारताना दिसत आहे, आणि तसेच अभिनेत्रीच्या बाजूला भूषण उभा राहिला आहे. मिठी झाल्याबरोबरच लगेचच अनुषा रेखाजी सोबत भूषणची ओळख करून देताना दिसत आहे. ज्यामध्ये तिघेही खूप आनंदी संवाद साधत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
हे देखील वाचा – Pournimecha Fera: शुभम प्रोडक्शन फिल्म्सने भयभीत करणारी वेबसिरीज ‘पौर्णिमेचा फेरा’ केली प्रदर्शित!
भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर करताय डेटिंग?
भूषण प्रधानला अनुषा दांडेकर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पाहिल्याचं भेटली. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटामध्ये दोघांनीही एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भूषणने अनुषाला खूप मदत केली. चित्रपटानंतर या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले. यानंतर ते अनेकदा वेगवेगळ्या इव्हेंट आणि कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. अनुषा मध्यंतरी भूषणसोबत कॉफी डेटला देखील गेली होती ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत. चाहत्यांना या दोघांची जोडी प्रचंड आवडत आहे. दरम्यान भूषण प्रधान अनुषा दांडेकरला डेट करत असल्याची देखील चर्चा होत आहे. परंतु या बातमीला अद्यापही या दोघांनी दुजोरा दिला नाही आहे.