(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कॅप्टन्सीसाठी चुरस रंगणार आहे. यावेळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरात नवव्या दिवशी कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. यामध्ये स्पर्धकांसमोर दोन दारं असणार आहेत. एक दार आहे शेणाचं आणि दुसरं दार आहे मेणाचं. आता कोणते स्पर्धक शेणाच्या घरात जाणार आणि मेणाच्या घरात एन्ट्री घेऊन कॅप्टन्सीची उमेदवारी कोण मिळवणार? हे आज येणाऱ्या नवीन भागात स्पष्ट होणार आहे.
या कॅप्टन्सी कार्यासाठी घरात 3-3 स्पर्धकांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. यातील पहिली जोडी आहे. दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि दिव्या शिंदे. या तिघांमध्ये दिव्या या कॅप्टन्सी पदासाठी पात्र नाही असा दावा अनुश्रीने केला आहे. पण यावर दिव्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पुढची जोडी आहे सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने. याशिवाय रूचिता जामदार आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांच्यामध्ये सुद्धा कॅप्टन्सी पद मिळवण्यासाठी जोरदार चुसर रंगणार आहे. पण, यावेळी एक अमपेक्षित गोष्ट घडते… रूचिताच्या विरोधात अनुश्री आणि राधा या दोघी तिच्याच मैत्रिणी आहे. ज्या रूचिताला शेणाच्या घरात पाठवतात.
पुढे रूचिता चिडून यापुढे या माझ्या मैत्रिणी नाहीत असं सर्वांना सांगते. स्वत: शेणाच्या घरात गेल्यावर ती तन्वीला सुद्धा रागात कॅप्टन्सीच्या कार्यातूम बाहेर काढते. आणि रूचिता पुढे म्हणते मला यापुढे कोणालाच सपोर्ट करायचा नाही.
रुचिताच्या या निर्णयामुळे तन्वीला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार आहे. आता यावर तन्वी काय उत्तर देणार? हे सगळं आजच्या भागात पाहायला मिळेल.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ” या लोकांची गॅंग आहे रूचिता – राधा- अनुश्री -तन्वी” हे लोक आपआपसांत गेम खेळत आहेत, आता आयुष कॅप्टन झाला पाहिजे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.






