(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘धर्मवीर २’ या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारशाची मशाल हाती असलेले’ अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिश यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ आणि साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षीत सिक्वेल ZEE5 वर स्ट्रीम केला.
“धर्मवीर २” या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, आनंद इंगळे, कमलेश सातपुते, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळाले आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर “धर्मवीर २” हा चित्रपट झी5 या ओटीटीवर लाँच करण्यात आला. आणि लाँच झाल्याबरोबरच या चित्रपटाला एकाच आठवड्यात चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.
हे देखील वाचा – Bigg Boss 18 : पाचव्या आठवड्यात या बिग बॉसच्या सदस्यांवर नॉमिनेशन संकट
झी 5 ओटीटीवर “धर्मवीर २” या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. परंतु “धर्मवीर २” चित्रपटानं वाळवी चित्रपटाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ओटीटीवरही जगभरातील प्रेक्षकांनी “धर्मवीर २” या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हे देखील वाचा – Tony Mirchandani: ‘गदर’ फेम अभिनेता टोनी मिरचंदानी यांचे निधन, इंडस्ट्रीत पसरली शोककळा!
‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होणार आहे. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आले होते. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळणार आहे. महेश लिमये यांची देखणी सिनेमेटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे आणि आनंद दिघे यांच्या वारशाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे.