(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय मराठी कार्यक्रम असून त्यातील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असतात. त्यांच्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करताना दिसत असतात. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेनं सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात ‘तिची एन्ट्री झाली आहे. आता ती कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
Bigg Boss 19 : गौरवच्या प्रश्नांमध्ये अडकली तान्या, सत्य आले बाहेर, म्हणाला- तू जनतेला मूर्ख बनवले…
कोण आहे निखिलच्या आयुष्यातील ‘ती’?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात ‘ती’ कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. आता निखिलच्या आयुष्यातील ‘ती’ म्हणजे नेमकी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर, निखिलच्या आयुष्यातील ‘ती’ दुसरी-तिसरी कुणीही नसून त्याची नवीन ड्रीम बाईक आहे.
प्रत्येकाचं एक नेहमीच स्वप्न असतं की आपली स्वतःची बाईक किंवा कार असावी. ते स्वप्न निखिलनेसुद्धा पाहिलेलं आणि ते अखेर साकार केलं आहे. निखिलने त्याची ड्रीम बाईक Triumph Scrambler XC 400 खरेदी केली आहे. अभिनेत्यानं नव्या-कोऱ्या बाईकसोबत फोटोशूट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नवीन बाईक खरेदी करताना निखिलसोबत त्याची मित्रमंडळी आणि त्याचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित दिसले आहेत. निखिलने शेअर केलेली या पोस्टवर चाहत्यांनी आणि मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते देखील त्याच कौतुक करत आहेत.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट, कुनिका नाही… तर या ‘५’ स्पर्धकांना नॉमिनेशनचा धोका
निखिल बनेनं खरेदी केलेल्या या बाईकची किंमत जवळपास २.९४ ते ३.६८ लाख इतकी आहे. प्रत्येक शहरानुसार किंवा व्हरायटीनुसार ही किंमत बदलताना दिसत असते. दरम्यान, निखिल बनेच्या कामाबद्दल सांगायचं तर तो अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. निखिल सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतो आणि चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करताना दिसतो.