फोटो सौजन्य - Social Media
शेअर करण्यात आली व्हिडीओ :
सुप्रसिद्ध मराठी Photographer अतुल कसबेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नाना पाटेकरांची पोस्ट शेअर केली आहे. या मध्ये नाना व्यायामशाळेत व्यायाम करताना दिसत आहेत. मुळात, नाना वयाच्या सत्तरीत आहेत. अगदी वयाची 76 गाठलेला व्यक्ती व्यायामशाळेत तरुणांनाही नाही जमत असे ट्रायसेप डिप्स न थकता मारत आहे, हे पाहून खरंच नवल वाटेल. सगळीकडे नाना पाटेकरांचीच चर्चा आहे.
अतुल कसबेकरांनी या भन्नाट पोस्टखाली एक सुबक कॅप्शन दिले आहे. नानांचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, ” अहो! नानासाहेब. तुम्ही तर माझे Fitness चे उद्दिष्टच दिले. हे आहेत नाना पाटेकर. वयाची 76 ओलांडली तरी फिटनेस पहा. त्यांनी 15 tricep dips मारल्या आहेत. नानासाहेब तुम्ही Legend आहात.”
तरुणांनी भरभरून केली प्रशंसा :
नाना पाटेकरांची कमाल कसरत पाहून त्यांच्या तरुण चाहत्यांनी त्यांना आदर्शच बनवले आहे. तर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका नेटकऱ्याने विनोदी भाष्यात म्हंटलं आहे “उदय भाई अजूनही Fit दिसत आहेत” एका चाहत्याने “नाना आता तुम्ही माझे आदर्श आहात.” असे कमेंट केले आहे. अशा अनेक कौतुकाची रांग तरुणाईने लावली आहे. तसेच नाना तुम्ही सोशल मीडियावर सतत सक्रिय राहण्याची मागणी तरुणाईने केली आहे.






