GT Vs RCB Pitch Report (फोटो- istockphoto)
आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
टॉप 4 साठी होणार चुरशीची लढाई
Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: आज गुजरातमधील अहमदाबाद येथे असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी आजचा (IPL 2026) सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे.
आज आयपीएलचा 42 वा सामना होणार आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडीयम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि गुजरातकडून शुभमन गिल यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते. मागच्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा पराभव केला होता. मात्र आता गुजरात टायटन्सच्या बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरला आहे. येथील पीच सपाट असल्याने बॉल बॅटवर व्यवस्थित येतो. त्यामुळे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना मदत मिळू शकते. नवीन बॉल असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग करण्यासाठी मदत मिळेल.सामन्याच्या दुसऱ्या डावात स्पिनर्सना मदत मिळू शकते. या ठिकाणी थोडा टर्न त्यांना मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात दव पडू शकते. त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो.
Orange Cap and Purple Cap ची रेस आता अधिक चुरशीची! ३ फलंदाजांनी केला ४०० चा आकडा पार
या खेळपट्टीवर सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होतो, त्यामुळे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या स्पेलवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.आरसीबीचाकडून फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आपल्या घरच्या मैदानावर शुभमन गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. गुजरातला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर गिलची बॅट चालणे गरजेचे आहे.
आरसीबीचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांचे पारडे जड वाटत असले तरी, गुजरातला त्यांच्या घरच्या मैदावर कमी लेखणे आरसीबीला महागात पडू शकते. आजचा सामना केवळ दोन गुणांसाठी नाही, प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील महत्वाचा असणार आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा आरसीबीचा तर टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याचा गुजरातचा प्रयत्न असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, जॅकब बेथेल , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हॅझलवूड, रसिक सलाम डार , सुयश शर्मा.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा






